आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे गोव्यात ७३व्या वर्षी निधन
By किशोर कुबल | Updated: April 2, 2024 15:25 IST2024-04-02T15:24:40+5:302024-04-02T15:25:19+5:30
'इंडिया अगेन्स्ट करप्शन' चळवळीनंतर सुरुवातीच्या काळात जे काही नेते प्रथम आम आदमी पक्षात गेले, त्यात वाघेला यांचा समावेश होता.

आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे गोव्यात ७३व्या वर्षी निधन
पणजी: आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला (वय ७३) यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. आम आदमी पक्ष गोव्यात वाढवण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. वाघेला हे बाबाजी या टोपण नावाने परिचित होते.
'इंडिया अगेन्ट करप्शन' चळवळीनंतर सुरुवातीच्या काळात जे काही नेते प्रथम आम आदमी पक्षात गेले त्यात वाघेला यांचा समावेश होता. आपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे ते सदस्य होते. मंगळवारी दुपारी सांतइनेज हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.