दिक्षा गंगावार खून प्रकरणाचे लागेबंद चेन्नईत; प्रकरणाची गुंतागुंत वाढली
By सूरज.नाईकपवार | Updated: January 24, 2024 11:35 IST2024-01-24T11:34:34+5:302024-01-24T11:35:08+5:30
चेन्नईच्या त्या युवतीची नोंदवून घेणार पोलिस जबानी

दिक्षा गंगावार खून प्रकरणाचे लागेबंद चेन्नईत; प्रकरणाची गुंतागुंत वाढली
मडगाव: दिक्षा गंगावार खून प्रकरणाचे लागेबंद चेन्नई येथे असून, आपल्या प्रेयसीसाठी गौरवने तिला समुद्रात पाण्यात बुडवून ठार मारले. पोलिस तपासात ही बाब पुढे आली आहे. चेन्नईतील त्या युवतीची जबानी आता पोलिस नोंदवून घेणार आहेत. एकतर तिला कॉल लेटर पाठवून देण्यात येईल वा चेन्नईला जाउन तिची जबानी नोंदवून घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गौरवचे त्या मुलीशी प्रेमसंबध होते. घरच्याने त्याच्या मनाविरुध्द त्याचा विवाह दिक्षाशी केला होता. तो तिला नांदवायलाही तयार नव्हता. विवाहाला दीड वर्षे लोटूनही तो कधीही गोव्यात यापुर्वी तिला घेउन आला नव्हता.
१९ जानेवारीला गौरवने दिक्षाला अक्टिवा दुचाकीवरुन बसवून फिरायला जाण्याचा बहाणा करुन तिला राजबाग येथील काब द राम समुद्रकिनारी आणले होते. या किनाऱ्यावर तशी वर्दळ जास्त नसते. एका खडक्याच्या बाजूला तो तिला घेउन गेला व तिला नंतर पाण्यात तीचे तोंड व नाक दाबवून तीला गुदमरुन मारुन टाकले होते. किनाऱ्यावरील काही पर्यटकांनी या दोघांना तेथे जाताना बघितले होते.
गौरव हा एकटाच नतंर बाहेर आला होता. त्यानंतर काही मिनिटातच दिक्षाचा मृतदेह पाण्याबाहेर तंरगू लागल्याने गौरवचे बिग फुटले व या खुनाला वाचा फुटली. दिक्षाला बुडविताना दोघांमध्ये झटापटही झाली होती. गौरवच्या छातीवर ओरबडल्याच्या खुणा सापडल्या आहेत.