शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दिगंबर कामत यांच्या कार्यालयावर दगडफेक

By admin | Published: October 26, 2015 3:00 AM

मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान

मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्या वेळी कामत आपल्या समर्थक उमेदवाराच्या निवडणुकीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी बाहेर गेले होते. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी दगडफेक करून पोबारा केला. अज्ञातांनी हेल्मेट परिधान केले होते. कामत यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. हा भाडोत्री हल्ला असून, त्यामागील मास्टरमाइंडला पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी केली. चोवीस तासांत या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. दिलेल्या मुदतीत जर दोषी सापडले नाहीत तर पुढील दिशा कार्यकर्तेच ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या ४२७ व ३३६ कलमाखाली हे प्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. नीलेश प्रभू तक्रारदार आहेत. वरवर दिसते तशी ही घटना साधीसुधी नाही. १९८५ पासून आपण राजकारणात आहे. तेव्हापासून आपले हेच कार्यालय आहे. असे कृत्य करण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती. माझ्या राजकीय कारकिर्दीत अशी घटना प्रथमच घडली आहे, असे कामत म्हणाले. दगडफेकीची घटना घडली तेव्हा कार्यालयात कामत यांचे पीएसओ नीलेश प्रभू व अन्य एकजण आतमध्ये होते. दगडफेक झाल्यानंतर प्रभू हे बाहेर आले असता, पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून दोघेजण वेगात जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्या दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. त्यामुळे हा (पान १० वर)