नाटक व चित्रपटातील संवादांत फार अंतर
By Admin | Updated: June 1, 2014 01:48 IST2014-06-01T01:42:50+5:302014-06-01T01:48:49+5:30
पणजी : नाटकामध्ये संवाद, तर चित्रपटामध्ये व्हिज्युअल महत्त्वाचा असतो. नाटक व चित्रपटामध्ये संवादांत फार अंतर असते, असे सांगत ज्या नाटकाच्या संवादांमध्ये

नाटक व चित्रपटातील संवादांत फार अंतर
पणजी : नाटकामध्ये संवाद, तर चित्रपटामध्ये व्हिज्युअल महत्त्वाचा असतो. नाटक व चित्रपटामध्ये संवादांत फार अंतर असते, असे सांगत ज्या नाटकाच्या संवादांमध्ये व शब्दांमध्ये दोन अर्थ असतात, ते नाटक अधिक उठून व चांगल्या पद्धतीने खुलते, असे मत प्रख्यात नाटककार व अभिनेता अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. कला अकादमीच्या कृष्ण कक्षामध्ये डॉ. अजय वैद्य यांनी भडकमकर यांच्याशी प्रकट मुलाखतीतून संवाद साधला. नाटकामध्ये संवादाची ताकद असते, तर चित्रपटामध्ये व्हिज्युअलचा जास्त प्रभाव असतो. नाटकामध्ये व्हिज्युअलवर मर्यादा येऊ शकतात. मात्र, चित्रपटामध्ये मर्यादा येत नाही. कमी संवादांमधून जास्तीत जास्त व्हिज्युअलमध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. नाटकाविषयी बोलताना भडकमकर म्हणाले की, पूर्वीच्या तुलनेत नाटकामध्ये नाटककार वेगवेगळ्या पद्धतीने बदल घडवत. मात्र, सध्याच्या स्थितीत नाटकांमधील मूल्ये बदलत चालली आहेत. नाटककार, नाट्य कलाकार व दिग्दर्शक तिघे एकाच सूत्रामध्ये बांधले गेलेले आहेत. तिघांना एकत्र काम करताना आपल्यामध्ये असलेल्या अहंकाराचा त्याग करून काम करावे लागते. एकमेकांना समजून घ्यावे लागते. नाटक सादर करताना कोणावरही अन्याय होऊ नये याच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाट्य लेखकाविषयी बोलताना भडकमकर म्हणाले, आपल्या आजूबाजूला जे घडते, दिसते तेच लेखक आपल्या नाटकामध्ये मांडत असतो. आपल्या नाटक लिहिण्याअगोदर १० वेळा ते नाटक मनात तयार करून पाहायला हवे. लेखक नाटक एकटा लिहितो; पण एक समूह नाटक सादर करतो व एक समूह नाटक पाहत असतो. (प्रतिनिधी)