शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

गोव्यातील धनगर समाजासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना वेळच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:08 IST

राजनाथ सिंह यांची भेट न झाल्यानं शिष्टमंडळाचा अपेक्षाभंग

पणजी : गोव्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींच्या (एसटी) केंद्रीय यादीत केला जावा अशा प्रकारची मागणी घेऊन गोव्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांना भेटावे असे ठरले होते. त्याच अपेक्षेने सोमवारी शिष्टमंडळ दिल्लीतही दाखल झाले पण राजनाथ सिंग यांची भेट मिळू शकली नाही. यामुळे शिष्टमंडळाच्या किमान दोघा सदस्यांचा तरी अपेक्षाभंग झाला.धनगर समाजाचा समावेश एसटींमध्ये केला जावा, ही मागणी करून समाजातील काही कार्यकर्तेही आता थकले आहेत. एसटींमध्ये समावेश करण्याबाबतची आश्वासने तेवढी मिळतात असा अनुभव काही नेत्यांना आतापर्यंत आला आहे. तरीही केंद्रीय ट्रायबल व्यवहार मंत्री जुआल ओरम यांना आणि गृह मंत्री राजनाथ सिंग यांना गोव्याच्या शिष्टमंडळाने भेटावे असे ठरले होते. आरजीआयने उपस्थित केलेल्या विविध त्रुटींमुळे आतार्पयत धनगर समाजाचा विषय मागे पडला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, डॉ. जानू झोरे व राजेंद्र केरकर यांना हा एकूण विषय जास्त ठाऊक आहे. या सर्वानी खासदारांसोबत सोमवारी  दिल्लीत केंद्रीय ट्रायबल मंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर विषय मांडला. गोवा सरकारच्या श्वेतपत्रिकेविषयीही चर्चा झाली. केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी अगोदर अपॉइन्टमेन्ट दिली होती पण नंतर काय झाले ते अनेकांना कळले नाही. राजनाथसिंग यांना दिल्लीबाहेर जावे लागले व अपॉइन्टमेन्ट रद्द झाली, असे एका सदस्याने लोकमतला सांगितले. राजनाथसिंग यांनी भेटण्याची जास्त गरज होती, कारण त्यांना विषय जास्त चांगल्या पद्धतीने कळला असता असे एक सदस्य म्हणाले. पाच राज्यांमधील आठ समाजाचे विधेयक सध्या केंद्र सरकारसमोर आहे. त्यात गोव्याच्या धनगर समाजाचा समावेश केला जावा असे समाज बांधवांना वाटते.राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, राजेंद्र केरकर, डॉ. जानू झोरे व समाज कल्याण खात्याचे उपसंचालक सुदेश गावडे यांचा समावेश होता.तिन्ही खासदारांनी पोटतिडकीने धनगर समाजाचा विषय मार्गी लावायला हवा. पाच राज्यांमधील आठ समाजाचे विधेयक सध्या केंद्र सरकारसमोर आहे. त्या विधेयकात गोव्यातील धनगर समाजाचाही समावेश करायला हवा. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्राने निर्णायक पाऊले उचलायला हवीत. त्यासाठी गोव्यातील तिन्ही खासदारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी पोटतिडक व जास्त आस्था दाखवावी. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यांत धनगरांचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्री र्पीकर यांनी विधानसभेत दिली होती. आता पुन्हा निवडणुका होण्यास फक्त सहा महिने शिल्लक आहेत.- बाबू कवळेकर 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणgoaगोवा