मुरगावचा विकास होणारच

By Admin | Updated: April 10, 2015 01:58 IST2015-04-10T01:58:15+5:302015-04-10T01:58:30+5:30

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर

The development of Murgaon will continue | मुरगावचा विकास होणारच

मुरगावचा विकास होणारच

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर या शहराचा तसेच राज्याचाही विकास होणार आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या वाट्याला येत असलेली १५६ कोटी रुपये कराराप्रमाणे खात्यात जमा केलेले आहेत. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यामुळे यापुढे वास्को शहरातील प्रदूषण, तसेच अपघात होण्याची समस्या सुटणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गुरुवारी संध्याकाळी रवींद्र भवन बायणा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दक्षिण गोव्यात बांधण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव आर. के., वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, सार्वजनिक खात्याचे प्रमुख अभियंते परिमल राय, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन सिरिल जॉर्ज, मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, कायतू डिसिल्वा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागाचे अभियंते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जनरल मॅनेजर राजीव सिंग, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्ष
डॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.
वरुणापुरी ते मुरगाव बंदर या ८.७५ कि.मी. लांबीच्या सुमारे ५४६ कोटी रुपये खर्चून उड्डाण पुलासह बांधण्यात येणाऱ्या चौपदरी महामार्गाचा या कामात समावेश आहे.
या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हा मार्ग इतर महामार्गांना जोडला जाईल, त्यामुळे मुरगाव बंदर अधिक विकसित होईल.
या सोहळ््यास खास उपस्थित राहिलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणात ‘वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा रस्ता गेली १५ वर्षे रखडला होता. समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार खटखटावे लागले आणि त्यात यश मिळाले. यासाठी आमदार मिलिंद नाईक यांनी बराच पाठपुरावा केला; पण हा रस्ता पूर्ण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांना द्यावे लागेल,’ असे सांगितले.
मंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे कळाल्यावर काटेबायणा, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भरती रेषेच्या आत असलेल्या बेकायदेशीर घरमालकांनी गेले २५५ दिवस मामलेदार कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केलेल्या पीडितांनी आपला मोर्चा रवींद्र भवनकडे वळविला होता; पण पोलिसांनी तो काही अंतरावर अडविला. तसेच गोवा बार्जमालक संघटना, दाबोळी विमानतळ
काळ््या-पांढऱ्या टॅक्सी संघटना
आणि मुरगाव बंदर आणि गोदी कामगार संघटना आदींनी केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.
मुरगावचे आमदार वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन चाटे आणि अक्षता पुराणिक भट
यांनी अनुक्रमे हिंदी आणि कोकणी भाषेतून केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The development of Murgaon will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.