पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर
By समीर नाईक | Updated: March 8, 2024 16:59 IST2024-03-08T16:58:35+5:302024-03-08T16:59:30+5:30
राज्य पर्यटन खात्याने आयटीबी बर्लिन २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे.

पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर
समीर नाईक, पणजी: राज्य पर्यटन खात्याने आयटीबी बर्लिन २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे. यंदा डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार राज्य पर्यटन खात्याला जाहीर झाला असून, आयटीबी बर्लिन येथील प्रतिष्ठित पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनतर्फे (पटवा) हा पुरस्कार दिला जातो. हल्लीच ट्रॅव्हल अवॉर्ड समारंभात पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यासोबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनाही टुरिझम मिनीस्टर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे गोव्याची ही अभिमानस्पद गोष्ट आहे.
बर्लिन, जर्मनी येथे एका समारंभात राज्याचे पर्यटन सचिव संजीव आहुजा, यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. आहुजा यांनी या पुरस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्याच्या विविध आकर्षणे आणि शाश्वत पर्यटन पद्धतींबाबत बांधिलकी दाखवण्यासाठी गोवा पर्यटनाच्या प्रयत्नांवर भर दिला.
गोव्याने आपल्या पर्यटन धोरणाचा भाग म्हणून अध्यात्मिक पर्यटनाच्या पैलूंसह पुनर्संचयित पर्यटनाचा अवलंब करून भारतामध्ये एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमांचा उद्देश राज्याच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे आहे. गोव्याला भेट देणाऱ्या अभ्यागतांनाt एक समग्र आणि समृद्ध अनुभव प्रदान करणे हेही आमचे प्रमुख ध्येय आहे, असेही आहुजा यांनी सांगितले.
पर्यटन खाते शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटन पद्धतींना चालना देण्यासाठी, अभ्यागतांना पर्यटनाचा उत्तम अनुभव मिळण्यासाठी आणि अग्रगण्य जागतिक गंतव्यस्थान म्हणून गोव्याचे स्थान मजबूत करण्यासाठी समर्पित आहे. भविष्यात अनेक उपक्रम राबविले जाणार आहे, ज्यातून राज्यातील पर्यटक खाते अधीक बळकट होत जाणार आहे, असेही आहुजा यांनी यावेळी सांगितले .