पोलिसांच्या हरकतीनंतरही सनातनविरोधात आज मोर्चा
By Admin | Updated: October 11, 2015 01:32 IST2015-10-11T01:32:07+5:302015-10-11T01:32:17+5:30
फोंडा : रामनाथी येथील सनातन संस्थेतर्फे रविवार, दि. ११ रोजी फोंड्यातील जून्या बसस्थानकावर आयोजित मासिक हिंदू आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली असून सनातनच्या समर्थनार्थ

पोलिसांच्या हरकतीनंतरही सनातनविरोधात आज मोर्चा
फोंडा : रामनाथी येथील सनातन संस्थेतर्फे रविवार, दि. ११ रोजी फोंड्यातील जून्या बसस्थानकावर आयोजित मासिक हिंदू आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली असून सनातनच्या समर्थनार्थ फेरी काढण्यासाठी तसेच रामनाथ युवा संघातर्फे सनातन विरोधात मोर्चा काढण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. फोंडा पोलिसांनी निषेध मोर्चासाठी परवानगी नाकारली असली, तरी रामनाथ युवा संघातर्फे दुपारी ३.३0 वाजता जाहीर सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी या जाहीर सभेवर लक्ष केंद्रित केले असून सभा घेतली तरी हरकत नाही. मात्र, त्यासाठी ध्वनिक्षेपक वापरण्यास अनुमती देणार नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सभा आयोजकांना अटक करण्याचा इशाराही पोलीस सूत्रांनी दिला आहे.
दुसऱ्या बाजूने सनातन संस्थेतर्फे दर महिन्याला फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर हिंदू आंदोलनाचा भाग म्हणून विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निदर्शने केली जातात. पोलिसांनी या निदर्शनांना संस्थेचा मासिक उपक्रम या दृष्टीने परवानगी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणत्याही परिस्थिती ही सभा घेतली जाईल, असे सांगितले. फोंडा पोलिसांनी निषेध मोर्चाला घेतलेली हरकत ही राजकीय दबावापोटी असल्याचे सांगून जाहीर सभेला निमंत्रित सर्व वक्त्यांनी आपली उपस्थिती निश्चित केल्याचे ते म्हणाले.
अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांतर्फे योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे
सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)