भाजपच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दोन पालिका ‘निसटल्या’
By Admin | Updated: November 6, 2015 02:14 IST2015-11-06T02:14:04+5:302015-11-06T02:14:22+5:30
पणजी : काणकोण व कुंकळ्ळी या दोन पालिकांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपचेच असावेत म्हणून सत्ताधारी पक्षाने व सरकारने गेले काही दिवस शर्थीचे प्रयत्न केले.

भाजपच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दोन पालिका ‘निसटल्या’
पणजी : काणकोण व कुंकळ्ळी या दोन पालिकांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपचेच असावेत म्हणून सत्ताधारी पक्षाने व सरकारने गेले काही दिवस शर्थीचे प्रयत्न केले. विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या गेल्या; पण त्या दोन्ही पालिकांवर गुरुवारी भाजपचा झेंडा फडकू शकला नाही. तिथे बिगरभाजप गटांनी आपले नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आणले.
कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक व काणकोणचे आमदार तथा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांची कामगिरी पालिका निवडणुकीत भाजपला जशी अपेक्षित होती तशी झाली नाही. त्याविषयी भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. कुंकळ्ळी पालिकेच्या निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र पॅनल उभे करा, असा सल्ला आमदार राजन नाईक यांना भाजपच्या श्रेष्ठींनी दिला होता; पण त्यांनी ज्योकिम आलेमावविरुद्ध चाल खेळताना काँग्रेसच्याच जॉन मोंतेरो यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता. मोंतेरो यांचे उमेदवार निवडून आले तर ते आपल्याच गटाला मिळतील, अशी आमदार नाईक यांना खात्री होती. तशी ग्वाही त्यांनी भाजपच्या काही राज्यस्तरीय नेत्यांना दिली होती. त्यामुळे भाजपची कोअर टीम निश्चिंत राहिली होती; पण प्रत्यक्षात निवडणूक निकालानंतर नाईक यांचे केवळ दोन उमेदवार निवडून आले व मोंतेरो यांचे काही विजयी उमेदवार आलेमाव यांना जाऊन मिळाले. यामुळे कुंकळ्ळी (पान २ वर)