दक्षिण गोव्यात डेंग्यू, मलेरियाची लागण

By Admin | Updated: June 12, 2015 00:47 IST2015-06-12T00:47:15+5:302015-06-12T00:47:40+5:30

मडगाव : नेसाय, सां जुझे आरियल या भागात डेंग्यूचे सहा रुग्ण, तर बाणावलीत मलेरियाचे पाच रुग्ण सापडले. त्यामुळे या भागात खबरदारीचे उपाय म्हणून

Dengue in south Goa, malaria infection | दक्षिण गोव्यात डेंग्यू, मलेरियाची लागण

दक्षिण गोव्यात डेंग्यू, मलेरियाची लागण

मडगाव : नेसाय, सां जुझे आरियल या भागात डेंग्यूचे सहा रुग्ण, तर बाणावलीत मलेरियाचे पाच रुग्ण सापडले. त्यामुळे या भागात खबरदारीचे उपाय म्हणून रक्तचाचणी आणि डास निर्मूलन मोहीम मंगळवारपासून हाती घेण्यात आली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सासष्टीत एकूण डेंग्यूचे सात रुग्ण सापडले असून त्यात सहा रुग्ण सां जुझे आरियल भागातील असून एक रुग्ण राय-मनोरा येथील आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन शिंदे यांनी याची तातडीने दखल घेत त्या भागात उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले. यासंबंधी चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठकही घेण्यात आली.
आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीला मडगाव व कुडतरीचे आरोग्याधिकारी तसेच सां जुझे द आरियलचे सरपंच उपस्थित होते. सां जुझे द आरियल येथे मोठ्या प्रमाणावर भंगारअड्डे असून या भंगारअड्ड्यात आवश्यक असलेली खबरदारी घेत नसल्यामुळेच डेंग्यू व मलेरियासारख्या साथी पसरतात, अशी भीती स्थानिक सरपंचांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या भागातील या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी एकूण पाच पथके नेमण्यात आली असून सासष्टीचे मामलेदार (पान ८ वर)

Web Title: Dengue in south Goa, malaria infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.