बांधकाम पाडणारे कॅमऱ्यात कैद; क्राईम ब्रँचकडून अशफाक शेखला अटक
By वासुदेव.पागी | Updated: June 27, 2024 13:20 IST2024-06-27T13:20:01+5:302024-06-27T13:20:29+5:30
अशफाक हा घटनास्थळी हजर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे.

बांधकाम पाडणारे कॅमऱ्यात कैद; क्राईम ब्रँचकडून अशफाक शेखला अटक
वासुदेव पागी, पणजी: आसगाव येथील बांधकाम पाडण्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने आज अशफाक कादिर शेख या अब्दुल कादिर शेख या 40 वर्षांच्या मंगूर वास्को येथील इसमाला अटक केली आहे. अशफाक हा घटनास्थळी हजर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे. गुन्ह्यासाठी मुख्य संशयिताला ह्युंदाई क्रेटा कार देण्यात आली होती. हेच वाहन गुन्ह्याच्या ठिकाणाहून टिपलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये कैद झाले आहे. हे वाहनही जप्त करण्यात आले आहे.
हे प्रकरण हणजूण पोलिसांकडून क्राईम ब्रॅचकडे हे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आले आहे. राहुल गुप्ता आयपीएस, एसपी क्राईम यांच्या देखरेखीखाली निरीक्षक निनाद देउलकर, लक्ष्यी अमोणकर आणि विकास दयकर उपअधिक्षक राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले आहे.