डेल्टा कॉर्पचे शेअर्स गडगडले, जीएसटी महासंचालकांकडून नोटीसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोड
By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 14:15 IST2023-09-26T14:14:40+5:302023-09-26T14:15:08+5:30
Goa News: गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो व्यवसाय चालवणाय्रा डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीसह तिच्या उपकंपन्यांना १६,८२१ कोटी रुपये भरण्यासाठी जीएसटी महासंचालकांकडून नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत.

डेल्टा कॉर्पचे शेअर्स गडगडले, जीएसटी महासंचालकांकडून नोटीसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोड
- किशोर कुबल
पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो व्यवसाय चालवणाय्रा डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीसह तिच्या उपकंपन्यांना १६,८२१ कोटी रुपये भरण्यासाठी जीएसटी महासंचालकांकडून नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत.
मांडवी नदीपात्रात डेल्टाचे कॅसिनो जहाज आहे. ११,१४० कोटी रुपयांची डिमांड नोटीस डेल्टा कॉर्पला काढण्यात आली. त्यानंतर डेल्टाच्याच उपकंपन्या असलेल्या कॅसिनो डेल्टिन डेंझोंग, हायस्ट्रीट क्रुझेस व अन्य एका मिळून तीन उपकंपन्यांना ५,६८२ कोटी रुपयांच्या डिमांड नोटिसा बजावण्यात आल्या. शेअर बाजारात यामुळे डेल्टाच्या शेअर विक्रीवर परिणाम झाला व शेअर्स घसरले.
दरम्यान, कंपनीने या डिमांड नोटीसांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. येथील मांडवी नदीपात्रात सहा कॅसिनो तरंगती जहाजे आहेत. जुगार खेळण्यासाठी देश, विदेशातून हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. गोवा सरकारला कॅसिनोंकडून वर्षाकाठी सुमारे ४५० कोटी रुपये महसूल मिळतो.