शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील गुन्हेगारांना गोव्यात शिताफीने अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 19:25 IST

दिल्ली येथे नाकाबंदीवेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाºयावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाºया तिघांना कळंगुट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. 

म्हापसा -  दिल्ली येथे नाकाबंदीवेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाºयावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाºया तिघांना कळंगुट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी, उपअधीक्षक किरण पौडवाल आणि निरीक्षक जीवबा दळवी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार  दि. ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे नियमित होणाºया नाकाबंदीत तिघांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर गोळीबार करून ते फरार झाले होते. यात विपीन सुनील डागर (२४-दिल्ली), प्रवीण सुर्जय डागर (२३-दिल्ली) आणि अजय कुमार कृष्णलाल अहलावत (२२-हरयाणा). हे संशयित आरोपी पलायन करून गोव्यात आले होते. कळंगुट येथील एका वाईन शॉपमध्ये मद्य खरेदी करण्यासाठी आला आणि त्याने  आपल्याकडील एटीएम कार्ड स्वाईप  करून रक्कम अदा केली होती. सादर माहिती गोवा पोलिसांना दिल्ली पोलिसांनी त्याचवेळी कळविली असता अधीक्षक चौधरी यांनी कळंगुट पोलीस चौकीचे निरीक्षक जीवबा दळवी यांना कळविले असता उशीर न करता त्या वाईनशॉपवर तब्बल दीडतास देखरेख करून तिघांपैकी एकटा पुन्हा मद्य खरेदी करण्यासाठी आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर त्याने दाखविलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बसलेल्या इतर दोघांना ताब्यात घेतले, रात्री ८ वाजता अधीक्षक चौधरी यांना दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी कळंगुटमध्ये असल्याचे कळविले आणि ११.१५ वाजता त्यांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे इतर चार मित्र होते. परंतु गुन्हा करणाºया तिघांना ताब्यात घेऊन भादंसच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आले आहे.  

यावेळी निरीक्षक जीवबा दळवी यांच्यासह उपनिरीक्षक सीताराम मळीक , कीर्तिदास गावडे, हवालदार संज्योत केरकर, समीर नाईक, विजय पिरणकर यांनी कारवाई केली. यातील एक संशयित आरोपी प्रवीण डागरवर जम्मू काश्मीर येथील पोलीस स्थानकावर गुन्हा नोंदविण्यात  असून उत्तराखंडमधील विशेष पोलीस पथकाने अटक केली होती. आरोपीना लवकरच दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crimeगुन्हाgoaगोवा