दिल्लीतील व्यक्तीचा गोव्यात खून

By admin | Published: June 20, 2016 09:24 PM2016-06-20T21:24:01+5:302016-06-20T21:24:01+5:30

दिल्लीहून गोव्यात आणून एका वयस्कर माणसाचा खून करून गुन्हेगारांनी पळ काढला. ही घटना पणजी बसस्थानकावरील एका हॉटेलच्या खोलीत घडली.

A Delhi man murdered in Goa | दिल्लीतील व्यक्तीचा गोव्यात खून

दिल्लीतील व्यक्तीचा गोव्यात खून

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० -  दिल्लीहून गोव्यात आणून एका वयस्कर माणसाचा खून करून गुन्हेगारांनी पळ काढला. ही घटना पणजी बसस्थानकावरील एका हॉटेलच्या खोलीत घडली. 
रविवारी संध्याकाळी पाच जण दिल्लीहून पणजीत आले होते. पणजी बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यामधील एकाचा खून करून चौघेही पळून गेले. खून करण्यात आलेल्याचे नाव वीरेंद्र कुमार असून तो दिल्ली येथील राहणारा आहे. वीरेंद्र कुमारला ठार मारण्यासाठीच गोव्यात आणले गेले होते, असे तपासातून स्पष्ट झाले आहे; कारण त्याच्याव्यतिरिक्त कोणाचेही ओळखपत्र हॉटेलमध्ये दिले नव्हते. त्यामुळे इतर संशयितांची नावे पोलिसांना मिळाली नाहीत. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. 
सकाळी हॉटेल कर्मचा:याला संशय आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. बाहेरील राज्यातून आणून गोव्यात खून करून पळून जाण्याची ही पहिली वेळ नसून, याआधीही एका इसमाने याच ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये आणून आपल्या पत्नीला मारून पलायन केले होते. खून केल्यानंतर पलायन करण्यासाठी बसस्थानकही जवळ असल्यामुळे गुन्हेगारांच्या ते पथ्यावर पडते. (प्रतिनिधी)
 
व्हिडीओ फुटेजमध्ये टिपले...
आपले नाव व पत्ता लपविण्यास संशयितांना यश आले असले तरी त्यांचे चेहरे लपून राहिले नाहीत. हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमे:यात संशयित टिपले गेले आहेत. त्या फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. खून करून संशयित दिल्लीला पळाल्याचा अंदाज आहे.

Web Title: A Delhi man murdered in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.