गालजीबाग-तळपण, माशे पुलांचे कंत्राट निश्चित

By Admin | Updated: October 8, 2015 01:42 IST2015-10-08T01:41:57+5:302015-10-08T01:42:12+5:30

पणजी : गालजीबाग-तळपण व माशे या दोन पुलांसह काणकोण बायपासच्या कामाचे कंत्राट एम. व्ही. राव कंपनीस निश्चित झाले आहे. एकूण २९७ कोटी रुपये

Definition of Gaalji Bag-Pellet, Machh Bridge | गालजीबाग-तळपण, माशे पुलांचे कंत्राट निश्चित

गालजीबाग-तळपण, माशे पुलांचे कंत्राट निश्चित

पणजी : गालजीबाग-तळपण व माशे या दोन पुलांसह काणकोण बायपासच्या कामाचे कंत्राट एम. व्ही. राव कंपनीस निश्चित झाले आहे. एकूण २९७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे काणकोणमध्ये वाहतुकीचे अंतर दहा किलोमीटरने कमी होणार आहे.
केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने या कामाची निविदा जारी केली होती. वित्तीय निविदा आता जारी करण्यात आली. त्यानुसार
एम. व्ही. राव कंपनीची निविदा ही
कमी किमतीची असल्याने त्या कंपनीची निवड कंत्राटदार म्हणून पक्की झाली
आहे. अजून कंपनीस कामाचा आदेश
तेवढा दिला गेलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गालजीबाग-तळपण व माशे पूल तसेच बायपास रस्त्यामुळे काणकोण, माशे अशा भागातील दाट लोकवस्ती वगळून वाहतूक पुढे जाईल. तसेच हा प्रकल्प चौपदरी असल्यामुळे वाहने जलदगतीने जातील. सध्या साडेसतरा किलोमीटरचे जे अंतर आहे, ते साडेसात किलोमीटरपर्यंत येईल.
एकूण दहा किलोमीटरचा फरक पडणार असल्याने काणकोणमधील वाहतुकीत फार फरक पडेल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, जुवारी नदीवर आठ पदरी समांतर केबल स्टेड पूल उभारण्यासाठी सरकार आग्रही आहे; पण अजून
जुवारीच्या कामाची निविदा जारी
झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दिल्लीस जाऊन
वारंवार त्या कामाचा पाठपुरावा करत
आहेत, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Definition of Gaalji Bag-Pellet, Machh Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.