मुख्यमंत्र्यांविरुद्ध अवमान याचिका
By Admin | Updated: October 25, 2015 02:11 IST2015-10-25T02:11:35+5:302015-10-25T02:11:58+5:30
पणजी : हरमल येथे झालेली धिरयो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध ‘पीपल्स फॉर अॅनिमल्स’ या संघटनेकडून उच्च न्यायालयात

मुख्यमंत्र्यांविरुद्ध अवमान याचिका
हरमलची धिरयो भोवली : वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश
पणजी : हरमल येथे झालेली धिरयो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध ‘पीपल्स फॉर अॅनिमल्स’ या संघटनेकडून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची नावेही याचिकेत आरोपी म्हणून नोंदविली आहेत. २० सप्टेंबर रोजी पालये-हरमल येथे झालेल्या धिरयोप्रकरणी ही याचिका आहे. या धिरयोमुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्याचे अॅड. नॉर्मा आल्वारिस यांनी म्हटले आहे. धिरयोवर पणजी खंडपीठाचा बंदीचा आदेश असताना आणि या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले असताना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात या धिरयो झाल्या. त्यात अनेक बैल जायबंदी झाले. कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा निष्प्रभ झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी या सर्वांना याचिकेत आरोपी करण्यात आले आहे. ‘धिरयो हा गोव्याचा पारंपरिक उत्सव आहे,’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)