डिसेंबर २0१६ मध्ये निवडणूक?

By Admin | Updated: December 8, 2015 01:15 IST2015-12-08T01:15:01+5:302015-12-08T01:15:11+5:30

गोवा विधानसभेचा कार्यकाळ १८ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार असला तरी, पाच वर्षांपूर्वीप्रमाणेच या वेळीही निवडणूक

December 2016 election? | डिसेंबर २0१६ मध्ये निवडणूक?

डिसेंबर २0१६ मध्ये निवडणूक?

सद्गुरू पाटील ल्ल पणजी
गोवा विधानसभेचा कार्यकाळ १८ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार असला तरी, पाच वर्षांपूर्वीप्रमाणेच या वेळीही निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका तीन महिने अगोदरच घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. डिसेंबर २०१६ किंवा जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
कोणत्याही विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर निवडणुका घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असतो. मात्र, सहाऐवजी तीन महिने अगोदर आयोग निवडणुका घेतो. गोव्यात २०१२ साली तसेच घडले. ३ मार्च २०१२ रोजी गोवा विधानसभेची निवडणूक झाली होती. प्रत्यक्षात विधानसभेचा कार्यकाळ त्या वेळी मे २०१२ मध्ये संपत होता. विधानसभेची पहिली बैठक ज्या दिवशी झाली, त्या दिवसापासून कार्यकाळ मोजला जातो. गोवा विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ मार्च २०१२ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे १८ मार्च २०१७ रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येतो. तथापि, तीन महिने अगोदरच गोवा विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती मिळू लागली आहे. गोव्याबरोबरच अन्य काही राज्यांच्याही विधानसभा निवडणुका प्रलंबित आहेत.
गोव्याची मतदारसंख्या सध्या १० लाख ७५ हजार झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २८ ते ३२ हजार मतदार आहेत. निवडणुका कधीही होऊ शकतात अशी कल्पना आल्यामुळे मतदार याद्या तयार ठेवण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आल्तिनो येथील कार्यालयाने सुरू ठेवली आहे. विधानसभा निवडणुकांवेळी मतदार याद्यांतून आक्षेपार्ह नावे गाळता येणार नाहीत. ती नावे आताच रद्द करण्याचे कामही सुरू आहे. सुमारे २५ हजार नव्या मतदारांची भर पडली आहे.
विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये किंवा मार्चमध्येही होणार नाहीत. त्या डिसेंबर २०१६ किंवा जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात होतील, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: December 2016 election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.