शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांची मोडतोड प्रकरण : आरोपी बॉयवर एका प्रकरणात आरोप निश्चित, तर दुसऱ्या प्रकरणात निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 18:05 IST

रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करण्याच्या दहा प्रकरणांतून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आलेला कुडचडेतील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने गुरुवारी आणखी एका प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव -  रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करण्याच्या दहा प्रकरणांतून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आलेला कुडचडेतील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने गुरुवारी आणखी एका प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले. तर अन्य एका प्रकरणात मडगावच्याच दुस-या न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित केले.गुरुवारी मडगावच्या दोन वेगवेगळ्या न्यायालयांसमोर ही दोन प्रकरणो होती. त्यात 6 जून 2017 या दिवशी चांदर येथे झालेल्या का-या खुरीस मोडतोड प्रकरणात मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नारायण आमोणकर यांनी संशयितावर आरोप निश्चित केले. तर 17 जून 2017 रोजी चांदर येथेच झालेल्या आल्मा खुरीस मोडतोड प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निलिमा काणकोणकर यांनी बॉयला निर्दोष  मुक्त केले.जून व जुलै महिन्यात ओळीने कित्येक धार्मिक स्थळांची मोडतोड झाली होती. त्यावेळी रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना रात्री उशिरा टॅक्सीची भाडी मारणा-या या बॉयच्या संशयित हालचाली दिसल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, कुडचडे येथील गार्डियन एंजल सिमेंट्रीत झालेल्या क्रॉसांच्या मोडतोड झालेल्या स्थळी संशयिताच्या हस्तांक्षरातील कागद मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याने तब्बल 150 मोडतोड प्रकरणांची कबुली दिली होती.आतार्पयत या संशयितावर वेगवेगळ्या न्यायालयात 19 प्रक़रणात आरोपपत्र दाखल केले होते. त्यातील 11 प्रकरणांतून आरोप निश्र्चितीपूर्वीच त्याची निर्दोष मुक्तता झाली. तर एका प्रकरणात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याला निर्दोष मुक्त केले. या 19 पैकी दोन प्रकरणात त्याच्यावर आरोप निश्चित झाले असून, आणखी सहा प्रकरणो वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.चांदरच्या आल्मा खुरीस प्रकरणातून निर्दोष मुक्त करताना न्या.काणकोणकर यांनी संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करण्याइतपत एकही पुरावा पुढे आलेला नाही, असे नमूद केले. तर न्या. आमोणकर यांनी प्रथम दर्शनी पुरावा असल्याचे नमूद करुन संशयितावर आरोप निश्चित केले.

टॅग्स :Crimeगुन्हाgoaगोवाCourtन्यायालय