शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

ढवळी येथील भंगार आग प्रकरण: भरलेला संसार सुद्धा बेचिराख

By आप्पा बुवा | Updated: May 8, 2023 23:23 IST

भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली आहेत.

अजय बुवा, फोंडाः शुक्रवारी ढवळी येथील भंगार अड्ड्याला लागलेल्या भीषण आगीत भंगार अड्डा बेचिराख झालाच.स्क्रॅप यार्डात  असलेला प्रत्येक नग आगीच्या भक्षस्थानी पडला.ह्या बरोबर ह्या आगीत दोन संसार सुद्धा बेचिराख झालेले आहेत. भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली  आहेत.

सदर भंगार अड्ड्याच्या बाजूलाच काही भाडोत्री खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये गवंडी काम करणारी दोन कुटुंबे राहात होती. त्या दोन्ही कुटुंबात संसाराला ज्ये गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या भरलेल्या होत्या . टीव्ही, फ्रिज, सिलेंडर, गृहोपयोगी वस्तू.कपडेलत्ते,जेवणाला लागणारे किराणामाल इत्यादी इत्यादी .ज्यावेळी भीषण आग लागली त्यावेळी घरातील कर्ते पुरुष नमाज साठी मस्जिद मध्ये गेले होते. तर लहान मुले जेवायला बसणार होती. घरातील स्त्रिया जेवणाची अंतिम तयारी चालू करण्यात मग्न होती. एवढ्यातच आगेचा लोट स्क्रॅप यार्डातून त्या दोन्ही घरात घुसला. काही कळायच्या आत दोन्ही कुटुंबातील खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. एकही कागदाचा चिटोर काढण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही. घरात जेवढे सामान भरले होते ते बेचिराख झाले.पै  पैसे जमवून जे काही किरकोळ दागिने करण्यात आले होते ते दागिने सुद्धा पूर्णपणे आगीत वितळून गेले. खोल्याच्या भिंती डोळ्यासमोरच पडल्या. अंगावर घातलेल्या कपड्यांवर  ती दोन्ही कुटुंबीय जे बाहेर पडले ते अजून बाहेरच आहेत. आणखीन दोन-तीन दिवस त्यांना ओळखीचे व बाकीचे जेवू खाऊ घालतील. आयुष्यभर काही त्यांना कोणी पोसायच्या भानगडीत पडणार नाही.

थोडक्यात या दोन्ही कुटूंबाला पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागेल. जे काही पण जे होते ते आगीच्या भक्षस्थानी पडले. आता पुन्हा एकदा संसाराला लागणारा प्रत्येक नग मिळवावा लागेल. तो बसवावा लागेल.त्या आगीत एका व्यवसायिकाचे स्वप्न जसे भस्मसात झाले त्याचबरोबर बाजूला असणारी   दोन गरीब कुटुंबे सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत.

वखार कुणाची वाट बघते?

सदर स्क्रॅप यार्डाच्या बाजूला एक लाकडाची वखार सुद्धा आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवून ठेवण्यात आले आहे. नशीब त्या दिवशी वखार वर आगीची वक्रदृष्टी पडली नाही. अन्यथा आणखीन एक मोठी आग लागली असती. आज ती आग  जरी आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी अजून धूमसत आहे. उद्या वाऱ्याच्या झोक्या बरोबर एखादी चिंगारी या वखारीवर पडली तर पुन्हा एकदा आहाकार माजू शकतो. कारण बाजूलाच आणखीन काही कुटुंबे राहात आहेत. मुख्य बाब म्हणजे ज्या खोल्या येथे बांधण्यात आल्या आहेत त्या कायदेशीर असण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेव्हा प्रशासनाने वखार हलविण्यात जर  अडथळे निर्माण होत असतील तर निदान त्या खोल्या संबंधित चौकशी करावी. जेणेकरून भविष्यातील आणखीन एक अनर्थ टाळता येऊ शकतो.

टॅग्स :goaगोवाfireआग