पाली येथे महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: April 8, 2015 00:25 IST2015-04-07T23:59:39+5:302015-04-08T00:25:20+5:30
पाली-सत्तरी : गूढ साथीच्या आजाराने पाली-ठाणे येथे चार बळी गेल्याचा दावा आरोग्य खाते करीत असले, तरी गेल्या दोन महिन्यांत पाली

पाली येथे महिलेचा मृत्यू
पाली-सत्तरी : गूढ साथीच्या आजाराने पाली-ठाणे येथे चार बळी गेल्याचा दावा आरोग्य खाते करीत असले, तरी गेल्या दोन महिन्यांत पाली परिसरात तब्बल १३ मृत्यू झाले आहेत. मंगळवारी शुभांगी अंकुश नाईक (६0) या महिलेचा ताप व अतिसाराने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १३ झाली आहे.
यातील बहुतेक मृत्यू अतिसार, ताप व उलट्यांमुळे झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी यामागचे खरे कारण आरोग्य खात्याने गुलदस्त्यात ठेवल्याने संभ्रम वाढला आहे. यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळू लागले असून गावात साथीचा जोर वाढतच चालला असतानाही लोक वैद्यकीय उपचाराऐवजी देवधर्म, घाडी-भगतांचे उंबरठे झिजवू लागले आहेत.
सध्या दर दिवशी दोन ते तीन ताप व अतिसाराचे रुग्ण वाळपई आरोग्य केंद्रात दाखल होत असून सध्या वाळपईत एक, गोमेकॉत दोन आणि खासगी दवाखान्यात चौघे रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५३ रुग्णांवर इस्पितळात उपचार
केले, अशी माहिती वाळपई आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा परुळेकर यांनी दिली.
दरम्यान, गावात एका बालकासह सहा ते सात जण तापाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्यास ही साथ आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी मृत्यू झालेल्या शुभांगी नाईक गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. गोमेकॉत उपचार करून त्यांना घरी आणले होते. या गूढ साथीने त्यांना गाठल्याने ताप व अतिसाराने त्यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दोन महिन्यांच्या काळात तेरावा बळी गेल्याने संपूर्ण ठाणे
गाव हादरला आहे. (खास प्रतिनिधी)
सविस्तर वृत्त/हॅलो १