शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मत्सरातून लहान बहिणीचा खून, गोव्यातील घटना; कुटुंबीयांचे अधिक प्रेम असल्याने मत्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:10 IST

लहान बहिणीला आपल्यापेक्षा कुटुंबीयांचे अधिक प्रेम मिळत असल्याच्या मत्सरातून मोठ्या बहिणीने तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे घडला. सोमवारी पोलिसांच्या तपासात ही घटना उघड झाली.

मडगाव (गोवा) : लहान बहिणीला आपल्यापेक्षा कुटुंबीयांचे अधिक प्रेम मिळत असल्याच्या मत्सरातून मोठ्या बहिणीने तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे घडला. सोमवारी पोलिसांच्या तपासात ही घटना उघड झाली.दीड दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करून घरी परतलेल्या काजल पप्पू यादव (१२) या छोट्या बहिणीचा गळा दाबून तिच्या मोठ्या बहिणीने खून केला. सांगे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयित मुलगी (१४) अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात ठेवले आहे. तिच्या चेहºयावर सख्ख्या बहिणीचा खून केल्याच्या पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता.सोमवारी पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला मोठी बहीण नकारार्थी उत्तरे देत होती. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. रविवारी रात्री काजल आईजवळ झोपण्यासाठी हट्ट करू लागली. मी झोपेचे सोंग घेऊन सर्व बघत होती.मी रात्री तीन वाजता उठले. आई व काजल झोपेत होत्या. आईला काहीच न कळता मी काजलच्या गळ्याभोवती नॉयलॉनची दोरी आवळली. ती तडफडू लागली व गतप्राण झाली. नंतर तिचा श्वास सुरू असल्याचे कळल्यावर मी दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. इतक्यात आई जागी होत असल्याचे पाहून हळूच माझ्या जागेवर जाऊन झोपले.काजल तडफडत होती, हे मी बघत होते. आई तिला काय झाले असे विचारत होती, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती, अशी माहिती संशयित अल्पवयीने मुलीने पोलिसांना दिली.खून का केला, यावर तिने सांगितले की, घरातील सगळी मंडळी काजलवर प्रेम करायची.मला मात्र कायम दुय्यम स्थान दिले जायचे. माझी कोणीच विचारपूस करीत नसत. त्यामुळे काजलला कायमचे संपवायचे, असा निर्णय घेतला.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस