शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:56 IST

गोव्यात गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान

पणजी: खून करून मृतदेह फेकून देण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून गोव्यात उघडकीस येऊ लागल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोव्यात दीड महिन्यात असे तीन मृतदेह सापडले आहेत. जुने गोवे येथे एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला होता. या महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी आमोणे येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाला डोकेच नसल्यामुळे तो खूनाचा प्रकारच असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा नोंदवला जाणार आहे. पोलिसांनी नंतर या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मयताचे नाव राजेश सावंत असे आहे. तीन दिवसात दोन मृतदेह आढळले व तेही खून व बलात्काराचे प्रकार असल्यामुळे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा धोक्याचा इशारा आहे. जुने गोवे खून प्रकरण आता जुने गोवे पोलिसांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे देणयात आले आहे. आमोणे येथील प्रकरण हे अत्यंत भयानक असून खून करून इसमाचे डोके धडापासून छाटून मृतदेह टाकून देण्यात आला आहे. मडगावातील बेल्लारी सुलतान खून प्रकरणाच्या स्मृती जाग्या व्हाव्यात एवढ्या भयंकर क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला आहे. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणे अशक्य व्हावे आणि गुन्हेगाराचा शोध घेणे आणखी कठीण व्हावे, या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला. आता मृतदेहाची ओळख पटल्यामुळे गुन्हेगारांचाही छडा लागेल अशी अपेक्षा आहे. या दोन्ही घटनांच्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात शहापूर - फोंडा इथे एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतु अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. फोंडा पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी  असाच एक हात पाय वगैरे नसलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती तो रतन करोल या ऊस रस विक्रेत्या व्यावसायिकाचा मृतदेह असल्याचे आढळून आले होते. हा खून एका पोलिसानेच केल्याचे पुरावे आढळून आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी या प्रकरणाचा तपास लावून न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात यश मिळवले होते. या पार्श्वभूमीवर या तीन पैकी किती खून प्रकरणाचा छडा लागतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूMurderखूनgoaगोवा