दयानंद सोपटे यांची काँग्रेस सचिवपदी नियुक्ती
By Admin | Updated: December 17, 2015 01:40 IST2015-12-17T01:39:51+5:302015-12-17T01:40:31+5:30
पणजी : काँग्रेस पक्षाला यापूर्वी सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार दयानंद सोपटे यांची अचानक काँग्रेस पक्षाने प्रदेश

दयानंद सोपटे यांची काँग्रेस सचिवपदी नियुक्ती
पणजी : काँग्रेस पक्षाला यापूर्वी सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार दयानंद सोपटे यांची अचानक काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोपटे यांच्यासह अन्य नऊ जणांची सचिव व अन्य पदांवर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. तसा आदेश अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यालयातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्याकडे लेखी स्वरूपात आला आहे.
सोपटे यांनी २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मांद्रे मतदारसंघात तिकीट दिले व तिथे त्यांचा पराभव झाला. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. ते भाजपमध्ये जातील, अशी हवा होती. तथापि, फालेरो यांनी कोणताच गाजावाजा न करता सोपटे यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेशही दिला व सचिवपदी त्यांची नियुक्ती करून घेतली.
(खास प्रतिनिधी)