दाऊद टोळीतील अतिरेकी साळगावात जेरबंद

By Admin | Updated: February 16, 2015 02:14 IST2015-02-16T02:13:55+5:302015-02-16T02:14:13+5:30

पणजी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगमधील ब्लॅक स्कॉर्पियॉन (काळा विंचू) म्हणून ओळखला जाणारा शार्प

Dawood gang raped in Salgah | दाऊद टोळीतील अतिरेकी साळगावात जेरबंद

दाऊद टोळीतील अतिरेकी साळगावात जेरबंद

पणजी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगमधील ब्लॅक स्कॉर्पियॉन (काळा विंचू) म्हणून ओळखला जाणारा शार्प शूटर श्याम किशोर गरिकापट्टी याला गोवा पोलिसांनी साळगाव येथे जेरबंद केले. पणजीपासून उत्तरेला सुमारे आठ किलोमीटरवरील साळगावात तो भाड्याच्या बंगल्यात आठ वर्षे राहत होता. या गुन्हेगारावर खून, खंडणी यासारखे सुमारे १९ गुन्हे महाराष्ट्र पोलिसांनी नोंद केलेत. हा कडवा अतिरेकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, श्यामला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
शनिवारी (दि.१४) रात्री गुन्हा अन्वेषण विभाग आणि उत्तर गोवा जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्याम गरिकापट्टीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मुंबई पोलिसांना १९९० पासून पाहिजे असलेला हा धोकादायक गँगस्टर साळगाव येथे चोघम रोडजवळ भाड्याच्या बंगल्यात राहात असल्याची माहिती एक दिवसापूर्वी गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शनिवारी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करून त्याला पकडले, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी येथे पत्रकार परिषदेत रविवारी (दि.१५) दिली.
पोलिसांनी ही मोहीम अत्यंत गोपनीयरीत्या यशस्वी केली. गुप्तता इतकी राखली की सशस्त्र पोलीस त्याच्या जवळ येऊन पोहोचेपर्यंत त्याला कोणतीही चाहूल लागलेली नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायला (पान २ वर)

Web Title: Dawood gang raped in Salgah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.