लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिल्लीत सर्व राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या घेतलेल्या बैठकीत दामू नाईक यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील पक्षाने प्राप्त केलेले यश तसेच आगामी निवडणुकांच्यादृष्टिने चालू असलेल्या तयारीवर भाष्य केले.
पत्रकारांनी दिल्ली भेटीबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, बुधवारी संपूर्ण दिवस नव्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक घेतली. ते आता विविध राज्यांच दौरा करणार असून गोव्यात येत्या ३० व ३१ असे दोन दिवस त्यांची भेट निश्चित झाली आहे. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर तो जाहीर केला जाईल.
दक्षिण आणि उत्तर गोव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. काही राज्यांमध्ये येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनीही आपले मुद्दे बैठकीत मांडल्याचे दामू म्हणाले.
Web Summary : Damu Naik discussed BJP's recent Goa Panchayat election success at a Delhi meeting. National President Nitin Nabin will visit Goa on the 30th and 31st. He will guide workers in South and North Goa. Assembly elections in some states were also discussed.
Web Summary : दामू नाइक ने दिल्ली में भाजपा की गोवा पंचायत चुनाव की हालिया सफलता पर चर्चा की। राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन 30 और 31 तारीख को गोवा का दौरा करेंगे। वे दक्षिण और उत्तरी गोवा में कार्यकर्ताओं का मार्गदर्शन करेंगे। कुछ राज्यों में विधानसभा चुनावों पर भी चर्चा हुई।