दाबोळी विमानतळ रात्री बंद; उड्डाणाच्या वेळा बदलल्या
By Admin | Updated: October 2, 2015 02:43 IST2015-10-02T02:43:28+5:302015-10-02T02:43:38+5:30
वास्को : गुरुवारी रात्रीपासून दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात येणार असल्याने रात्री १० ते पहाटे ४ अशा सहा

दाबोळी विमानतळ रात्री बंद; उड्डाणाच्या वेळा बदलल्या
वास्को : गुरुवारी रात्रीपासून दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात येणार असल्याने रात्री १० ते पहाटे ४ अशा सहा तासांसाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नेहमी होणाऱ्या विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलण्यात आली असून कुठलेच विमान रद्द करण्यात आले नसल्याचे दाबोळी विमानतळ संचालक के. श्रीनिवासन राव यांनी सांगितले.
गुरुवारपासून दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्तीचे काम रात्री १० वाजल्यापासून सुरू करण्यात
आले. हे काम २९ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. या
वेळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा एकूण पाच ते सहा विमानांची ये-जा येथे होते. या विमानांच्या वेळा गुरुवारपासून बदलण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.
दुरुस्तीकामाच्या वेळेमुळे विमान वाहतूक हाताळणी व प्रवाशांची हाताळणी सुरळीत व्हावी, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने सर्व तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
(वार्ताहर)