शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

Cyclone Tauktae : गोव्यात वादळामुळे प्रचंड हाणी; केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहा यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:30 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे.

पणजी : गोव्यात वादळाने जी प्रचंड हानी केली आहे, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशी केली व गोव्यातील स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य तथा पाठींबा मिळेल, अशी ग्वाही दिली आहे. (Cyclone Tauktae: Massive damage due to storms in Goa; All assistance will be provided by the central government says Amit Shah)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे. शहा यांचा फोन आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शहा यांना याविषयीची कल्पना दिली. राज्यात वादळामुळे दोघांचा बळी गेला व चौघे जखमी झाले. आपत्त्कालीन निधीतून राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे. वादळामुळे ज्यांची हानी झाली त्यांना गोवा सरकार सहाय्य करील, असे मुख्यमंत्र्यांनीही सोमवारी म्हटले आहे.

अनेक गावे अंधारातदरम्यान, तिसवाडी, फोंडा, सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली, बार्देश, धारबांदोडा आदी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी दुपारपर्यंत तिथे वीज सुरळीत झाली नाही. पणजी व काही शहरांमधील वीज पुरवठा सुरळीत झाला. वीज खात्याची यंत्रणाही दिवसभर काम करत आहे. रात्रीच्यावेळीही वीज कर्मचारी काम करतात. त्यामुळे थोड्या ठिकाणी तरी वीज पुरवठा सुरळीत झाला पण काही भागांमध्ये काँक्रीटचे वीज खांब मोडून पडले. वीज तारा तुटल्या. ट्रान्सफोर्मर मोडले. वीज उपकेंद्रे बिघडली. तिथे साधनसुविधा उभ्या करण्यासाठी एक- दोन दिवस लागतीलच, असे खात्याच्या सुत्रांनी सांगितले. ताळगावमध्येही वीज पुरवठा चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ खंडीत आहे. दोनापावलच्या काही भागातली अशीच स्थिती होती. वीज नाही, म्हणून पाणी नाही अशी समस्या ताळगावमधील काही लोकांनी अनुभवली.

रस्त्यावरील अडथळे हटविण्याचे काम अग्नीशामक दलाचे जवान करत आहेत. एका पणजी व परिसरातून ८० फोन कॉल्स अग्ग्नीशामक दलाला आले. नगरसेवक, पंच, सरपंच यांनी मिळूनही काही मोडलेली झाडे कापणे किंवा ती रस्त्यावरून हटवून घेणे, असे काम केले.

कृषी क्षेत्राच्या हानीची पाहणी (चौकट)शेतकरी व बागायतदारांची वादळाने खूप हानी केली. गोव्याने असे वादळ कधीच अनुभवले नव्हते, असे लोकांनी सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी फिल्डवर जावे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकाची हानी पहावी व पाहणी अहवाल तयार करून तो तीन दिवसांत सादर करावा, असा आदेश उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळgoaगोवाAmit Shahअमित शहा