कस्टम विभागाने प्रवाशाकडून जप्त केले १ किलो ७२८ ग्राम तस्करीचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 10:47 PM2020-02-24T22:47:51+5:302020-02-24T22:47:59+5:30

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करून एका प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने तस्करीने आणलेले १ कीलो ७२८ ग्राम सोने जप्त केले.

Customs Department seized 5 kg 3 grams of smuggled gold from passengers | कस्टम विभागाने प्रवाशाकडून जप्त केले १ किलो ७२८ ग्राम तस्करीचे सोने

कस्टम विभागाने प्रवाशाकडून जप्त केले १ किलो ७२८ ग्राम तस्करीचे सोने

Next

वास्को: सोमवारी (दि.२४) गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करून एका प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने तस्करीने आणलेले १ कीलो ७२८ ग्राम सोने जप्त केले. दुबईहून बंगळूर ला जात असलेले विमान प्रथम दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर या विमानात एक प्रवासी तस्करीचे सोने नेत असल्याची माहीती कस्टम विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई करून सदर सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुबईहून बंगळूरला जाणाऱ्या एअर इंडिया (एआय ९९४) विमानातील प्रवाशावर सदर कारवाई करून तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. दुबईहून गोव्याच्या मार्गाने होत बंगळुरूला जाणार असलेल्या एअर इंडिया विमानातील एक प्रवासी तस्करीचे सोने नेत असल्याची पूर्व माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. सोमवारी सदर विमान दुबईहून गोव्यात उतरल्यानंतर कस्टम अधिका-यांनी प्रवाशांच्या तपासणीस सुरुवात केली असता त्यांना या विमानात बंगळुरूला जाण्यासाठी प्रवास करत असलेल्या एका प्रवाशावर दाट संशय आला.

त्वरित त्याला बाजूला घेऊन त्याची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना सदर प्रवाशाकडून १ किलो ७२८ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने आढळले. सदर तस्करीचे सोने गोळ््यांच्या आकाराने बंद करून लपवून नेण्याचा प्रयत्न सदर प्रवासी करत होता असे कस्टम अधिकाºयांच्या यावेळी नजरेस आले. या तस्करीच्या सोन्याची किंमत ६३ लाख ६४ हजार ८३७ रुपये असल्याची माहीती कस्टम विभागातील अधिकाºयाकडून प्राप्त झाली आहे. कस्टम विभागाने सदर सोने जप्त केले असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

या आर्थिक वर्षात कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावरून अजून पर्यंत जप्त केले १ कोटी ६८ लाखांचे तस्करीचे सोने दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने एप्रिल २०१९ अर्थात यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत विविध कारवाईत १ कोटी ६८ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहीती येथील कस्टम विभागाच्या अधिकाºयांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Customs Department seized 5 kg 3 grams of smuggled gold from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.