कळसा येथे बांध घालण्याचे काम कूर्मगतीने

By Admin | Updated: May 24, 2014 00:26 IST2014-05-24T00:23:47+5:302014-05-24T00:26:27+5:30

कळसा येथे बांध घालण्याचे काम कूर्मगतीने

Curiously, the construction work of the camp in Kalwa | कळसा येथे बांध घालण्याचे काम कूर्मगतीने

कळसा येथे बांध घालण्याचे काम कूर्मगतीने

डिचोली : म्हादई पाणी वाटप लवादाच्या आदेशानुसार तिन्ही राज्यांच्या अधीक्षक अभियंत्यांच्या देखरेख समितीने शुक्रवारी कळसा कालव्याला नियोजित भेट दिली असता त्यांना कर्नाटकाने लवादाच्या आदेशानुसार कामाची पूर्तता करण्यासाठी चालवलेली चालढकल लक्षात आली. याप्रकरणी गोवा व महाराष्ट्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी कर्नाटक निरावरी निगमच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. लवादाच्या आदेशानुसार कर्नाटक निरावरी निगम ३१ मे पूर्वी कळसा कालव्याच्या ठिकाणी पाणी अडवण्याचा बांध घालण्यास अपयशी ठरले तर लवादाच्या आदेशाचे उल्लंघन होणार असून, त्याची जबर किंमत मोजावी लागणार असल्याचे सांगितले. कर्नाटक निरावरी निगमचे अधीक्षक अभियंता नरसिंह अण्णावर हे ३१ मे रोजी निवृत्त होत असून, आपल्या निवृत्तीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे देखरेख समितीने त्यांना कणकुंबी येथे बस्तान मांडून लवादाच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे ठणकावले. (प्रतिनिधी)

Web Title: Curiously, the construction work of the camp in Kalwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.