लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : येथील शिमगोत्सव मिरवणुकीस मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. श्री वडेश्वराच्या चरणी श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, समितीचे पदाधिकारी नगरसेवक आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार केदार नाईक, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, नेहाल तळावणेकर, नगरसेवक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पथकांनी कलात्मक चित्ररथ, रोमटामेळ, आकर्षक वेशभूषा व लोकनृत्यांच्या माध्यमातून आपले सांस्कृतिक वैभव सादर केले. हजारो नागरिकांनी मिरवणुकीचा आनंद घेतला.
चित्ररथ, लोकनृत्य आणि रोमटा मेळ मिरवणुकीमुळे वातावरण अत्यंत उत्साही झाले होते. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली होती. वाहतूक खाते, पोलिस विभाग तसेच उत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी शिस्त व सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था केली होती.
वाहतूक खात्याने सादर केलेला जनजागृतीपर आकर्षक चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. यावेळी बोलताना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, शिमगोत्सव हा डिचोलीच्या सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे. गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील देखावे तसेच पारंपरिक रोमटामेळ, लोकनृत्य वेशभूषा ही खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाची शान असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : Dicholi's Shimgotsav procession, inaugurated by MLA Dr. Shetye, showcased vibrant cultural displays. Floats, folk dances, and Romtamel troupes from across Goa participated. Thousands enjoyed the festive atmosphere, with special arrangements for safety and traffic. MLA Shetye highlighted Shimgotsav as Dicholi's cultural treasure.
Web Summary : विधायक डॉ. शेट्ये द्वारा उद्घाटित डिचोली की शिमगोत्सव शोभायात्रा में जीवंत सांस्कृतिक प्रदर्शन हुआ। पूरे गोवा से झांकियों, लोक नृत्यों और रोमटामेल मंडलियों ने भाग लिया। हजारों लोगों ने उत्सव के माहौल का आनंद लिया, सुरक्षा और यातायात के लिए विशेष व्यवस्था की गई। विधायक शेट्ये ने शिमगोत्सव को डिचोली का सांस्कृतिक खजाना बताया।