लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी
By समीर नाईक | Updated: January 12, 2024 15:40 IST2024-01-12T15:39:38+5:302024-01-12T15:40:07+5:30
शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस लोकोत्सव मध्ये स्टॉल्स उभारण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असल्याचे खात्याने जाहीर केले होते.

लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी
पणजी: राज्यात दि. २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान कला व संस्कृती खात्यातर्फे लोकत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कला व संस्कृती खात्याच्या कार्यालयात शुक्रवारी अर्ज मिळवण्यासाठी सकाळ पासून लोकांनी गर्दी केली.
शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस लोकोत्सव मध्ये स्टॉल्स उभारण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असल्याचे खात्याने जाहीर केले होते. एकूण ५६० स्टॉल्स यंदा लोकोत्सवमध्ये असणार आहे. पहिल्याच दिवशी अंदाजे ४०० अर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी दिली. गोमंतकीयांना १०० स्टॉल्स सुमारे १०० स्टॉल्स यंदा गोमंतकीयांना लोकोत्सव मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. काही स्टॉल्स हे सरकारी खात्यांचे, बिगर सरकारी संस्थेचे स्टॉल्स येथे असणार आहे. तर उर्वरित स्टॉल्स हे इतर राज्यातील असणार आहे.