जीसीएला न्यायालयाचा दणका

By Admin | Updated: June 26, 2015 01:44 IST2015-06-26T01:43:54+5:302015-06-26T01:44:14+5:30

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या एकाधिकारशाहीला चपराक देताना ६४ क्लबांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा निर्णय अवैध ठरविला आणि १३ जून

Criminal Court of GCA | जीसीएला न्यायालयाचा दणका

जीसीएला न्यायालयाचा दणका

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या एकाधिकारशाहीला चपराक देताना ६४ क्लबांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा निर्णय अवैध ठरविला आणि १३ जून रोजी नामांकन यादी पाठविलेल्या सर्व संस्थांना मतदानाचा हक्क देण्याचा आदेश दिला. निवृत्त न्यायाधीश ए. पी. लवंदे व अ‍ॅड. नितीन सरदेसाई यांच्यासह तीन सदस्यीय निवडणूक समिती नियुक्त केली असून या समितीच्या देखरेखीखाली २८ जून रोजी निवडणूक होईल.
जीसीएची विद्यमान समिती आणि आणि जीसीएशी संलग्न असलेले ६४ क्रिकेट क्लब यामधील न्यायालयीन लढाईचा निकाल जीसीएच्या विरोधात गेला. जीसीएचे व समितीचे सर्व मनसुबे उधळणारा हा निकाल ठरला असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी नसल्याचे न्यायमूर्ती एफ. एम. रेईश आणि के. एल. वदने यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. पी. लवंदे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय निवडणूक समिती नियुक्त करण्यात आली आहे. अ‍ॅड. नितीन सरदेसाई आणि निवडणूक समितीचे विद्यमान सदस्य रजनीकांत लावणीस हे त्याचे सदस्य आहेत. (पान २ वर)

Web Title: Criminal Court of GCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.