आज मतमोजणी
By Admin | Updated: March 20, 2015 01:20 IST2015-03-20T01:14:27+5:302015-03-20T01:20:42+5:30
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ५0 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता

आज मतमोजणी
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ५0 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू होईल. भाजपचे ३४, मगोचे ९ आणि अपक्ष १४९ मिळून
१९२ उमेदवारांचे भवितव्य निकालाअंती
स्पष्ट होईल.
राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांच्याशी संपर्क साधला असता, सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे त्यांनी सांगितले. मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात आल्याने निकालांना विलंब लागू शकतो. मतांची मोजणी पूर्ण होईपर्यंत अखंड काम चालूच राहणार आहे. काही तालुक्यांच्या बाबतीत निकाल उशिराने येण्याची शक्यता आहे.
राज्यात १२0९ मतदान केंद्रांवर मिळून
५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
उत्तर गोव्यात १,३१,९२४ पुरुष आणि १,३५,४0४ महिला मिळून २,६७,३0८ जणांनी मतदान केलेले आहे. तर
दक्षिण गोव्यात १,१९,१८२ पुरुष आणि १,३२,00९ महिला मिळून २,५१,१९१ जणांनी मतदान केलेले आहे.
भाजप उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ जागांवर, मगो उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९ जागांवर, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये १४९ अपक्ष आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली व सेंट लॉरेन्स (आगशी) या पाच जि. पं. मतदारसंघांची मतमोजणी कांपाल येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबल घातलेली असून इतर व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. राज्यात तालुकानिहाय इतर मतदारसंघांसाठीही मतमोजणीची अशीच व्यवस्था आहे. (प्रतिनिधी)