मतमोजणी आज

By Admin | Updated: March 11, 2017 01:41 IST2017-03-11T01:39:34+5:302017-03-11T01:41:24+5:30

पणजी : उत्तर गोव्यातील १९ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कांपाल येथे बाल भवन इमारतीत तर दक्षिण गोव्यातील २१ मतदारसंघांची

Counting today | मतमोजणी आज

मतमोजणी आज

पणजी : उत्तर गोव्यातील १९ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कांपाल येथे बाल भवन इमारतीत तर दक्षिण गोव्यातील २१ मतदारसंघांची मतमोजणी बोर्डा, मडगाव येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार आहे. सर्व सज्जता ठेवण्यात आली असून शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. बाल भवनमध्ये दहा हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. स्ट्राँग रूममधून सकाळी ७ वाजता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॉलमध्ये आणली जातील. पहिल्या टप्प्यात मांद्रे, शिवोली, म्हापसा, कळंगुट, हळदोणे, ताळगाव, पर्ये, सांत आंद्रे, डिचोली व मये या दहा मतदारसंघांची तर दुसऱ्या टप्प्यात पेडणे, साळगाव, पर्वरी, पणजी, सांताक्रुझ, वाळपई, कुंभारजुवे, थिवी व साखळी या नऊ मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. १२९ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या ७१ फेऱ्या होतील.

Web Title: Counting today