वाळपई ‘पीटीएस’मधील भ्रष्टाचार येणार चव्हाट्यावर
By Admin | Updated: March 19, 2015 01:18 IST2015-03-19T01:16:06+5:302015-03-19T01:18:11+5:30
पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक पातळीवरील चौकशीचा आदेश

वाळपई ‘पीटीएस’मधील भ्रष्टाचार येणार चव्हाट्यावर
पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक पातळीवरील चौकशीचा आदेश पोलीस महासंचालक टी. एन. मोहन यांनी दिला आहे. पीटीएसमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची लुबाडणूक होत असल्याची तसेच पीटीएसच्या कॅन्टीनमध्ये फार मोठा भ्रष्टाचार चालू असल्याची तक्रार आहे.
वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कथित घोटळ्यांची पोलीस महासंचालक टी. एन. मोहन यांनी दखल घेतली आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थींसाठी सुरू असलेल्या कॅन्टीनमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे तसेच प्रशिक्षणार्थींकडून मोठ्या प्रमाणावर विविध कारणांवरून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. जनरेशन नेक्स्ट या बिगर सरकारी संस्थेकडून या प्रकरणात पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. संघटनेचे प्रमुख दुर्गादास कामत व इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट्यमंडळाने महासंचालकांची भेट घेऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशीचा आदेश देण्यात आल्याची माहिती महासंचालकांनी दिली. पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी व्ही. रंगनाथन या प्रकरणाचा तपास करणार आहेत. या प्रकरणाची
सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)