‘नगर नियोजना’त भ्रष्टाचार बनला ‘शिष्टाचार’!
By Admin | Updated: November 29, 2015 02:00 IST2015-11-29T01:59:59+5:302015-11-29T02:00:16+5:30
पणजी : जमीन रुपांतरणासाठी लाच घेताना नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन सुरेश परब हा जरी रंगेहाथ पकडला गेला

‘नगर नियोजना’त भ्रष्टाचार बनला ‘शिष्टाचार’!
पणजी : जमीन रुपांतरणासाठी लाच घेताना नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन सुरेश परब हा जरी रंगेहाथ पकडला गेला असला, तरी या खात्यात लाचखोरी बोकाळल्याचे तसेच त्यात मोठे अधिकारीही अडकल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. लाच दिल्याशिवाय परवाना न देण्याचा या खात्याच्या विभागीय कार्यालयात अलिखित नियमच होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान परब याने एसीबीच्या तपास अधिकाऱ्याला बरेच काही सांगून टाकले. लाचेचे हप्ते कुणाकुणाला जात आहेत, कोणाचा किती वाटा आहे, याची सारी माहिती त्याने तपास अधिकाऱ्याला दिली. या प्रकरणात नगर नियोजन खात्याच्या एका
वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स पाठविण्याचीही शक्यता असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या परवान्यासाठी लोकांना विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच द्यावीच लागत होती. अन्यथा परवाने मिळत नव्हते, अशी माहितीही एसीबीला मिळाली आहे. जमीन रुपांतरणाच्या कागदपत्रांसाठी लाच घेताना परब याला अटक करण्यात आली होती. संदेश तळेकर यांच्याकडे त्याने ८ लाख रुपये लाच मागितली होती. त्याने याची माहिती एसीबीला दिल्यामुळे एसीबीने सापळा रचून परब याला रंगेहाथ अटक केली
होती. (प्रतिनिधी)