भ्रष्टाचारमुक्तीसाठी कटिबद्ध

By Admin | Updated: October 17, 2015 02:11 IST2015-10-17T02:11:06+5:302015-10-17T02:11:18+5:30

मडगाव : ‘फातोर्डा फॉरवर्ड’च्या १२ उमेदवारांनी शुक्रवारी लोहिया मैदानावर सामूहिकरीत्या शपथ घेत आपला बारा कलमी जाहीरनामा घोषित केला

Corrected for corruption | भ्रष्टाचारमुक्तीसाठी कटिबद्ध

भ्रष्टाचारमुक्तीसाठी कटिबद्ध

मडगाव : ‘फातोर्डा फॉरवर्ड’च्या १२ उमेदवारांनी शुक्रवारी लोहिया मैदानावर सामूहिकरीत्या शपथ घेत आपला बारा कलमी जाहीरनामा घोषित केला. हे बाराही उमेदवार निवडून आल्यास गट बदलणार नाहीत आणि भ्रष्टाचारालाही थारा देणार नाहीत, अशा प्रकारची शपथ डॉ. राममनोहर लोहिया यांच्या पुतळ्यासमोर या उमेदवारांनी घेतली. या वेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हेही उपस्थित होते.
या वेळी आमदार सरदेसाई म्हणाले की, मडगाव पालिकेत स्थिर व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळावे यासाठीच आपल्या पॅनलमध्ये चांगल्या उमेदवारांना ठेवण्यात आले आहे. यातील ११ उमेदवार हे नवे असून शहरासाठी काम करण्याची उमेद बाळगून ते या निवडणुकीत उतरले आहेत. या पॅनलद्वारे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
या वेळी सरदेसाई यांनी आपल्या पॅनलचा बारा कलमी जाहीरनामा घोषित केला. त्यात प्रभावी कचरा उचल, सुरक्षित रस्ते आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन, एलईडी दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य, हरित फातोर्डा हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून मोकळ्या जागेत उद्याने उभारणे, अत्याधुनिक होलसेल व किरकोळ भाजी-मासळी मार्केट, रहिवाशांसाठी कल्याण संघटना, सक्षम गटार योजना, लोकाभिमुख ई-सेवा, पावसाळ्यात प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, जुन्या घरांचे तसेच जुन्या विहिरींचे संवर्धन, अशी आश्वासने दिली आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Corrected for corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.