नगरसेवकाने स्वत:वर करवून घेतला दुग्धाभिषेक!

By Admin | Updated: October 31, 2015 02:22 IST2015-10-31T02:18:01+5:302015-10-31T02:22:01+5:30

मडगाव : लहान मुलांना पिण्यासाठी पुरेसे दूध मिळत नसल्यामुळे त्यांचे कुपोषण होते. गोव्यातही कामगार वस्तीत ही समस्या आहेच;

Corporator made himself on fire! | नगरसेवकाने स्वत:वर करवून घेतला दुग्धाभिषेक!

नगरसेवकाने स्वत:वर करवून घेतला दुग्धाभिषेक!

मडगाव : लहान मुलांना पिण्यासाठी पुरेसे दूध मिळत नसल्यामुळे त्यांचे कुपोषण होते. गोव्यातही कामगार वस्तीत ही समस्या आहेच; मात्र या पार्श्वभूमीवर निवडणुकीत निवडून आल्यास स्वत:वर दुधाचा अभिषेक करवून घेईन, असा नवस एका नगरसेवकाने बोलून तो प्रत्यक्षातही आणला. यामुळे कित्येक लिटर दुधाची नासाडी झाल्याची घटना काणकोण येथील मास्तीमळ भागात घडली आहे. या घटनेनंतर संबंधित नगरसेवकावर सोशल मीडियावरून टीका होत आहे.
निवडणुकीतील विजय वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. मात्र, पणजीपासून ७0 कि.मी. अंतरावर असलेल्या मास्तीमळ-काणकोण येथील किशोर शेट या उमेदवाराने अटीतटीच्या लढतीनंतर अवघ्या १६ मतांनी विजय मिळविला आणि या विजयासाठी देवाला सांगितलेला नवस फेडण्यासाठी स्वत:वर दुधाचा अभिषेकही करवून घेतला.
दक्षिण गोव्यातील टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेनंतर या नगरसेवकावर चोहोबाजूंनी टीका होत असल्यामुळे सध्या त्यांनी आपला मोबाईलही बंद ठेवला आहे.
गोव्यातील पालिका निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. या निवडणुकीत किशोर शेट यांनी प्रतिस्पर्धी धीरज नाईक गावकर यांच्यावर अवघ्या १६ मतांनी विजय मिळविला होता.
इथे गरिबांच्या मुलांना प्यायला दूध नाही आणि नवसाच्या नावाखाली दुधाची नासाडी का केली जाते, असा सवाल सोशल मीडियावरून केला गेला. काहीजणांनी त्यापुढेही जाऊन वेगवेगळ्या मंदिरांतील देवांवर होणारा दुधाचा अभिषेक कधी बंद होणार, असा सवालही केला.
या घटनेनंतर शेट यांच्याशी संपर्क
साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या घरीही ते आढळले नाहीत. शेट हे कामानिमित्त वास्को येथे राहतात; मात्र नगरपालिकेची निवडणूक त्यांनी आपल्या मूळ गावातून म्हणजेच काणकोणातून लढविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Corporator made himself on fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.