शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पणजीत विना मास्क फिरताना १५ पर्यटकांना मनपाकडून दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 8:04 PM

महापालिकेने आजतागायत सुमारे १५0 जणांना प्रत्येकी १00 रुपये दंड ठोठावला आहे

पणजी : पर्यटक कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने महापालिकेनेही कारवाई आरंभली असून आज रविवारी सकाळी येथील मेरी इमेक्युलेट चर्चच्या परिसरात १५ पर्यटकांना तोंडावर मास्क न बांधल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. महापौर उदय मडकईकर म्हणाले की, ‘आजपावेतो मासळी मार्केट तसेच बाजारपेठेतच मनपा निरीक्षक कारवाई करीत होते. आता आम्ही बेशिस्त पर्यटकांवरही लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने आजतागायत सुमारे १५0 जणांना प्रत्येकी १00 रुपये दंड ठोठावला आहे.’पर्यटनस्थळांना भेट देणारे पाहुणे शारीरिक दुरी किंवा तोंडावर मास्क बांधणे आदी मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन करुन वावरतात. यामुळे कोविडचा फैलाव होण्याचा धोका आहे. आज सकाळी पर्यटकांचा एक गट येथील चर्च स्क्वेअरमध्ये विना मास्क सर्व नियम धाब्यावर बसवून वावरताना महापौरांच्या नजरेस पडला. तात्काळ त्यांनी निरीक्षकांना आदेश देऊन १५ पर्यटकांना दंड ठोठावला. ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथे आल्यावर कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही भान रहात नसल्याचे दिसून आले आहे. खास करून किनाऱ्यांवर घोळका करून दाटीवाटीने उभे राहणे, फोटोसाठी एकमेकांना खेटून बसणे, गर्दीतही चेहऱ्यावरील मास्क उतरविणे आदी प्रकार घडत आहेत. १ सप्टेंबरपासून आंतरराज्य सीमा खुल्या झालेल्या आहेत. तसेच राज्यातील बारही खुले झालेले आहेत. बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर किंवा किनाºयांवर मद्याच्या बाटल्या नेऊन खुलेआम दारूचे प्राशन केल्यानंतर तरुण पर्यटकांना कशाचेही भान राहत नाही. मार्गदर्शक तत्वांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत मिरामार किनारा तसेच दोनापॉल जेटी येते. या दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. महापालिकेचे निरीक्षक आता या दोन्ही ठिकाणीदेखिल करडी नजर ठेवून असणार आहेत, असे महापौरांनी सांगितले.