शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : समुद्रात अडकलेल्या खलाशांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 19:45 IST

सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 200 जहाजावर 21 हजारापेक्षा अधिक खलाशी अडकून असून त्यात सुमारे 8 हजारांच्या आसपास गोवेकर आहेत.

मडगाव: जगभरात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सात आठवडे पुढे ढकलल्या असतानाही समुद्रात अडकलेल्या खलाशाना  मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे अशा  आशयाची आणखी एक याचिका दाखल केली आहे.गोव्यातील व्यावसाईक आणि सामाजिक कार्यकर्ते केनेथ सिल्व्हेरा यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संबंधी ' लोकमत' शी बोलताना सिल्व्हेरा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते जमिनीवर असलेल्या नागरिकांसाठी आहेत. आपण जी याचिका पाठविली आहे ती समुद्रात अडकलेल्यासाठी आहे असे ते म्हणाले.सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 200 जहाजावर 21 हजारापेक्षा अधिक खलाशी अडकून असून त्यात सुमारे 8 हजारांच्या आसपास गोवेकर आहेत. या खलाशाना परत आणण्यास  सरकार त्वरित पाऊले उचलत नसल्याने गोव्यात या खलाशांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड  नाराजीचे वातावरण आहे. लोकांचा बांध तुटल्यास ते रस्त्यावरही येऊ शकतील अशी परिस्थिती आहे.सिल्व्हेरा यांनी आपल्या याचिकेत समुद्रात अडकलेले खलाशी प्रचंड मानसिक तणावाखाली असून त्यांच्या कुटुंबियानाही घोर लागून राहिली आहे याकडे लक्ष वेधले आहे.कित्येकांना जहाजावरच मरण आले असून त्यांचे मृतदेहही तिथेच आहेत, कित्येकांना कोरोनाची लागणही झाली आहे. या परिस्थितीत ज्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना त्वरित बाहेर काढणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र सरकारला प्रत्येक देशातील भारतीय दूतावसाच्या साहाय्याने ह्या खलाशाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत