शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 11:25 AM

अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. 

- पाच दिवसातच आरक्षण १५ ते २0 टक्क्यांवर पणजी - आंतरराज्य हद्दीत  १ रोजी खुल्या केल्यानंतर हॉटेल आरक्षणात वृध्दी झाली आहे. अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘लॉकडाऊनपूर्वी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत गोव्यात रोज ८0  विमाने येत असत. आता अनलॉॅक ४ मध्ये ६0 टक्के म्हणजेच ४८ विमाने सुरु करण्यास परवानगी असतानाही प्रवाशी नसल्याने दिवसाकाठी केवळ ६ ते ७ विमानेच येतात. विमानांची संख्या वाढायला हवी. त्यातल्या त्यात अनलॉक ४ मध्ये बार चालू झाले ही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पूरक बाब ठरली आहे. जलसफरी करणाºया बोटी, स्विमिंग पूल आदी चालू व्हायला हवेत.’शहा यांनी अशी माहिती दिली की, राज्यातील सुमारे ५00 हॉटेलमालकांनी हॉटेले खुली करण्यासाठी परवानगी मागितली होती. पैकी अंदाजे ३५0 हॉटेल्स सुरु होऊ शकली. व्यवसाय बंद ठेवून परवडणारे नाही. व्यावसायिकांबरोबरच हॉटेलमधील कामगार उपाशी पडतील तसेच सरकारला महसुलास मुकावे लागेल.’ शहा म्हणाले की,‘ कोरोना कधी जाईल याची शाश्वती नाही. तो येथे रहायलाच आला आहे, या भावनेने आता या संकटाशी प्रत्येकाने सामना करावा लागेल. ६ फूट शारीरिक अंतर, तोंडावर मास्क वापरणे या गोष्टी पाळून पर्यटन व्यवसाय नव्या जोमाने सुरु करण्यास हरकत नाही.’शॅकमालकांची व्दिधा मन:स्थिती दरम्यान, किनाºयांवर शॅक उभारण्याबाबत व्यावसायिक व्दिधा मन:स्थितीत आहेत. शॅकमालक संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले की, कळंगुट, कांदोळी भागात व्यावसायिक यंदा शॅक उभारण्यास अनुत्सुक आहेत. ते म्हणाले की, सध्या तरी ७0 ते ८0 टक्के व्यावसायिकांनी शॅक न उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरराज्य हद्दी खुल्या झालेल्या असल्या तरी पर्यटक येतीलच अशी शाश्वती नाही. कोविडमुळे यंदाचा हंगामही चुकणार असे वाटते.’कांदोळीचे शॅकमालक तथा संघटनेचे उपाध्यक्ष सेबी डिसोझा म्हणाले की, ‘गेल्या हंगामात व्यावसायिकांना बराच फटाक बसलेला आहे त्यामुळे कोविडच्या या महामारीत पुन: कोणी धजावणार नाहीत. पर्यटक येतीलच याची खात्री नाही. केलेली गुंतवणूकही भरुन येण्याची शक्यता कमी त्यामुळे व्यावसायिक स्वस्थ बसणेच पसंत करतील. अहवालात अनेक शिफारशी दरम्यान, राज्य सरकारच्या सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास संस्था (जिपार्ड)आणि उच्च शिक्षण संचालनालय यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या अहवालात पर्यटन व्यावसायिकांना सरकारने कर्ज किंवा एकरकमी अनुदान देण्याची शिफारस अहवालात केली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही गोष्ट आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोठ्या रिसॉर्ट, हॉटेलांऐवजी राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ संकल्पनेला चालना देण्यावर भर देण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलgoaगोवा