CoronaVirus News: गोव्यात कोविड बळींची संख्या 525
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:43 IST2020-10-15T19:43:25+5:302020-10-15T19:43:31+5:30
मडगाव येथील 62 वर्षीय नागरिकाचा कोविडने मृत्यू झाला. त्याला अनेक वर्षे डायबेटीसही होता.

CoronaVirus News: गोव्यात कोविड बळींची संख्या 525
पणजी: राज्यात कोविड बळींची एकूण संख्या गुरुवारी 525 झाली. गुरुवारी सहाजणांचा कोविडने मृत्यू झाला. नवे 332 कोविडग्रस्त आढळले आहेत. साखळीत प्रथमच रुग्ण संख्या घटू लागली आहे.
मडगाव येथील 62 वर्षीय नागरिकाचा कोविडने मृत्यू झाला. त्याला अनेक वर्षे डायबेटीसही होता. मूत्रपिंडाचाही विकार होता. करंजाळे येथील 70 वर्षीय महिलेचाही कोविडने जीव घेतला. उत्तर गोव्यातील अन्य एका 80 वर्षीय महिलेचेही कोरोनाने निधन झाले. डिचोलीतील 74 वर्षीय पुरुष रुग्णाचेही निधन झाले. त्यालाही अनेक वर्षे डायबेटीस होता. सां जुङो दी आरियल येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्या एका पायाला गँगरीन झाले होते. हॉस्पिसियो इस्पितळात एका 45 वर्षीय अज्ञात व्यक्तीला मृतावस्थेतच गुरुवारी आणले गेले. त्या व्यक्तीचे नाव व पत्ताही इस्पितळाला ठाऊक नाही. त्या तरुणालाही कोविडने ग्रासले होते. सहापैकी तीन मृत्यू गोमेकॉ इस्पितळात तर एकाचा मृत्यू ईएसआय इस्पितळात झाला.
दरम्यान, गुरुवारी 1 हजार 582 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 332 व्यक्तींचे अहवाल पॉङिाटीव आले. 173 व्यक्तींनी होम आयसोलेशन स्वीकारले. 430 व्यक्ती गेल्या चोवीस तासांत कोरोनामधून ब:या झाल्या. साखळीत आता 199 कोविडग्रस्त आहेत. अगोदर तिथे तीनशेर्पयत संख्या गेली होती. डिचोलीतही संख्या घटली व 102 झाली आहे. वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत 119 तर पणजीत 214 संख्या आहे. पर्वरीला संख्या 291 आहे. मडगावला 287, फोंडय़ात 240 तर काणकोणला 110 कोविडग्रस्त आहेत.
नवे बाधित...332
एकूण बाधित...39770
सक्रिय रुग्ण....4084
एकूण मृत्यू......525