शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus 46 तबलिगी जमातचे नागरिक गोवा फिरायला आले होते; शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 9:09 PM

एकूण 63 वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल अजून येणो बाकी आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातून अनेक चाचण्यांचे अहवाल आले. ते नकारात्मक आहेत.

पणजी : देशाच्या विविध भागांतून 46 तबलिगी जमातचे नागरिक गोव्यात आले. ते गोव्यात फिरले. मशीदींमध्ये राहिले. अशा 46 तबलिगींचा शोध लागला व त्यांना क्वारंटाईन केले गेले आहे. इतरांचाही शोध सुरू आहे. लोकांनी काही सुगावा लागला तर सांगावे, कारण अशा व्यक्तींमुळे गोमंतकीयांच्या आरोग्याला धोका संभवतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले. 46 तबलिगींची वैद्यकीय चाचणी करून  कदाचित आज शुक्रवारी अहवाल मिळविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गोवा सुरक्षित झोनमध्ये असल्याचे कालर्पयत मी म्हणत होतो पण निजामुद्दीन दिल्लीतील मशिदीतील सोहळ्य़ात सहभागी झाल्यानंतर 46 तबलिगी व्यक्ती गोव्यात आल्या. नऊजण गोव्यात एका मशिदीत थांबले होते. वास्को व जुनेगोवेत प्रत्येकी चौघेजण, फोंडय़ात नऊजण, फातोर्डाला सोळाजण, डिचोलीत काहीजण पोहचले. हे सगळे दि. 15 मार्चपूर्वी गोव्यात आले होते. त्यानंतर ते आले नाहीत. या 46 व्यक्तींना आता निगराणीखाली ठेवले गेले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर अहवाल जर नकारात्मक आला तर गोवा शंभर टक्के सुरक्षित झोनमध्ये पोहचला असे म्हणावे लागेल. आणखीही काही व्यक्ती अशा प्रकारे येऊन कोणत्या गावात किंवा शहरात राहिलेल्या असतील तर लोकांनी लगेच संबंधित भागातील पोलिस निरीक्षकांना माहिती द्यावी. अशा व्यक्तींनी त्वरित वैद्यकीय चाचणीसाठी सुपूर्द करणो गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

63 अहवाल येणे बाकी एकूण 63 वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल अजून येणो बाकी आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातून अनेक चाचण्यांचे अहवाल आले. ते नकारात्मक आहेत. त्या शिवाय आणखी सतरा चाचण्यांचे अहवाल गोमेकॉतून येणो बाकी आहे.शिवाय तबलिगी व्यक्तींचे 46 अहवाल येणो बाकी आहे. या दिवसांत लोकांनी गरम पाणीच प्यावे. गरमी असली तरी, थंड पाणी पिऊ नये. आयुव्रेदिक आणि अन्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काढा प्यावा.  च्यवनप्राशचा आस्वाद घ्यावा. रुतूनुसार आहार ठेवावा. प्राणायाम करावा, असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना दिला.

विदेशात जहाजांवर जे सात हजार गोमंतकीय अडकले आहेत, त्यांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. देशभरातील अठरा हजार व्यक्ती अशा प्रकारे विदेशात अडकल्या आहेत. पंतप्रधानांसोबत सर्व राज्यांची गुरुवारी व्हीडीओ कॉन्फरन्स झाली, त्यावेळी हा विषय चर्चेत आला. पंतप्रधान या सर्वाना देशात आणू इच्छीतात. आम्ही त्यांना गोव्यात आणल्यानंतर एक महिना पूर्णपणो वैद्यकीय निगरणीखाली ठेवू. त्यांच्या कुटूंबियांनाही त्यांना भेटता येणार नाही. मी अशाच एका अडकलेल्या खलाशासोबत काल गुरुवारी बोललो असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या