शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारचा 'स्वयंपूर्ण' सर्व्हेक्षण अहवाल हा कॉपी पेस्ट! काँग्रेसची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:16 IST

खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे.

पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेली सात सूत्री योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. गोवा व्हिजन डॉक्युमेंट २0३५ ची नक्कल करुन 'स्वयंपूर्ण' सर्वे रिपोर्ट बनविण्यात आला, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसने केली आहे.प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात की, ''खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे. या अहवालातील सर्व सातही प्रमुख मुद्दे हे राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गठीत केलेल्या नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोल्डन ज्युबिली मंडळाने सूचविले होते. कामत यांनी विविध क्षेत्रातील १७ तज्ञांच्या समितीकडून तयार करुन घेतलेल्या अहवालाचे श्रेय सावंत सरकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. सावंत यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी. व्हिजन-२०३५ अहवालात सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा व स्वानंदी गोवा या प्रमुख मुद्यांवर भर देऊन सन २०३५ पर्यंत गोवा आतंराष्ट्रीय स्तरावर आदर्श राज्य म्हणून नावारुपास आणण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता. याच मुद्यांचा सावंत यांनी शनिवारी उल्लेख करुन गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.ते म्हणतात की, ह्यदेर आयी दुरूस्त आयी' या म्हणी प्रमाणे, कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतो व खरोखरच कॉंग्रेस सरकारने दूरदृष्टी ठेवून तयार केलेला हा अहवाल लवकरात लवकर हे सरकार अंमलात आणणार, अशी आशा बाळगतो, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.पर्रीकरांनी आकसापोटी अहवाल शीतपेटीत ठेवला : आरोपमाजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केवळ व्यक्तिगत आकसापोटी विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, प्रा. माधव गाडगीळ, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, डॉ. पी.एस. रामाणी, स्व. आर्किटेक्ट चार्लस कुरैया अशा १७ मान्यवरांच्या समितीने तयार केलेला अत्यंत महत्वाचा हा अहवाल तब्बल सहा वर्षे कपाटात बंद करुन ठेवल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.श्रेय काँग्रेसचे : दिगंबर कामतविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही सरकारवर टीकेचे झोड उठविताना असे म्हटले आहे की, ह्यमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी सातपदरी योजनेची जी घोषणा केली ती काँग्रेस सरकार सत्तेवर असताना स्थापन केलेल्या गोल्डन ज्युबिली मंडळाने सुचविली होती. २0१0 साली ज्येष्ठ शास्रज्ञ रधुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्त्वाखालील या मंडळाने गोवा-२0३५ व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृध्द, सुशासित आणि स्वानंदी गोवा संकल्पना मांडली होती. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या प्रयत्नाने हे घडले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी हीच संकल्पना उचलली आहे. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा