शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराला भोवले वाईन शॉप गुगल पे प्रकरण, सेवेतून निलंबित

By सूरज.नाईकपवार | Updated: July 12, 2023 18:11 IST

या प्रकरणात एक होमगार्डही गुंतला आहे. त्याच्यावर कारवाई संबंधी होमगार्ड कमांडरकडे पत्रव्यवहार केला आहे, असे ते म्हणाले.

सूरज नाईक पवार / मडगाव  मडगाव : वाईन शाॅपमध्ये जा व दंडाची रक्कम गुगल पे कर असे सांगणारा  गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा पोलिस ठाण्यातील हवालदार प्रशांत वेळीप याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणात वेळीप याने एका चालकाला दंड भरण्यास सांगितला होता. संबंधित वाईन शाॅपमध्ये जा व तेथे दंडाची रक्कम भर, असे सांगितले होते. त्यानुसार त्या वाहनचालकाने गुगल पे केले. मात्र त्याला त्याची पोचपावती दिली नव्हती. या घटनेचा गाजावाजा झाल्यानंतर पाेलिसांना हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे लागले. शेवटी वेळीप याला निलंबित केले गेले. मडगाव पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वेळीप याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात एक होमगार्डही गुंतला आहे. त्याच्यावर कारवाई संबंधी होमगार्ड कमांडरकडे पत्रव्यवहार केला आहे, असे ते म्हणाले.

प्रशांत वेळीप याला लवकरच बढती मिळणार होती. तो सहायक पोलिस उपनिरीक्षक बनणार होता. आता निलंबित झाल्याने त्याला या पदापासून सध्या तरी वंचित राहावे लागणार आहे. जुलै महिन्यात काही पोलिसांची वेतनवाढ होत आहे. वेळीप याचीही वेतनवाढ होणार होती. ज्या दुचाकी चालकाला पोलिसांनी तालाव दिला व वाईन शॉपमधील गुगल पे वर जीपे करण्यास सांगितले. त्याला भरलेल्या रकमेची दंडाची पावतीही देण्यात आली नव्हती. त्या वाहनचालकाच्या वडिलांनी याप्रकरणी त्या वाईन शॉपमालकाशी संपर्क साधून दिलेल्या पैशाबाबत चौकशीही केली होती. घडलेल्या घटनेच्या दिवशी कोलवा पोलिस ठाण्यावर अन्य एक उपनिरीक्षक होता. वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी नोंद करण्यासाठी त्यांना जे मशीन दिले जाते, त्यावर संबंधित अधिकाऱ्याचा आयडी नंबर नोंद करावा लागतो. मात्र वेळीप याने अन्य एका पोलिस उपनिरीक्षकाचा आयडी नंबर नोंद केला होता, अशीही माहितीही मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात काहीतरी कोळेबेरे असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे.

दरम्यान कोलवा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरोन डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्ही त्या वाईन शाॅप मालकाला बोलावून त्याची जबानी घेतल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिस