काही संरक्षण अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याचा विचार
By Admin | Updated: March 20, 2015 01:20 IST2015-03-20T01:15:52+5:302015-03-20T01:20:26+5:30
संरक्षण दलातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांना नजीकच्या काळात सक्तीने; परंतु सन्मानाने निवृत्तीचा प्रस्ताव देण्याचा विचार संरक्षणमंत्री

काही संरक्षण अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याचा विचार
सद्गुरू पाटील ल्ल नवी दिल्ली
संरक्षण दलातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांना नजीकच्या काळात सक्तीने; परंतु सन्मानाने निवृत्तीचा प्रस्ताव देण्याचा विचार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अत्यंत गांभीर्याने चालविल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेवाज्येष्ठता आणि बढतीवरून अन्याय झालेले तसेच कामचुकारपणामुळे मुख्य प्रवाहात न राहिलेले अनेक अधिकारी संरक्षण दलात आहेत. ही बाब पर्रीकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. संरक्षण दलाच्या कामास कंटाळलेल्या अशा अनेक अधिकाऱ्यांना सक्तीने; परंतु सन्मानाने निवृत्ती देण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात संरक्षण दलाच्या जास्त अधिकाऱ्यांची गरज आहे, तरीही तेथे अधिकारी मात्र खूप कमी संख्येने आहेत. दुसरीकडे जी राज्ये शांत म्हणून ओळखली जातात, तेथे संरक्षण दलातील अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. जेथे काम नाही तेथे जास्त अधिकारी आणि जेथे काम आणि गरज आहे अशा संवेदनशील राज्यात संरक्षण दलाचे कमी मनुष्यबळ, असे चित्र आहे. या वास्तवास संरक्षण दलातील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीच्या संरक्षणमंत्र्यांनी यावर कोणतीच उपाययोजना केली नाही. (पान ८ वर)