शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पहिल्यांदाच गोव्यातील लोहिया मैदानावर होणार नाही काँग्रेसची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 18:01 IST

मडगावचे ऐतिहासिक महत्त्वाचे लोहिया मैदान आणि निवडणुकीच्या सभा यांचे एकमेकांशी एवढे घट्ट नाते आहे की प्रत्येक निवडणुकीत पक्षाची प्रमुख सभा या मैदानावर घेतल्याशिवाय प्रचाराची सांगता केली जात नसे.

 मडगाव - मडगावचे ऐतिहासिक महत्त्वाचे लोहिया मैदान आणि निवडणुकीच्या सभा यांचे एकमेकांशी एवढे घट्ट नाते आहे की प्रत्येक निवडणुकीत पक्षाची प्रमुख सभा या मैदानावर घेतल्याशिवाय प्रचाराची सांगता केली जात नसे. मात्र यंदा प्रथमच काँग्रेस या मैदानावर सभा घेणार नाही असे संकेत मिळत असून, भाजपा व आप या दोन्ही पक्षांनी आपल्या सभेसाठी हे मैदान आरक्षित केले असले तरी काँग्रेसने अद्यापही त्यादृष्टीने काही हालचाल केलेली नाही.सध्या ख्रिश्चनांचा लेंट चालू असून,  या लेंटच्या शेवटच्या आठवडय़ाला होली व्हिक असे म्हणतात. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधव एक आठवडाभर धार्मिक कार्यात मग्न असतात. अगदी याच आठवडय़ात प्रचाराचे शेवटचे दिवस असून, गुडफ्रायडेनंतर दोन दिवसांनी प्रचाराला विराम मिळणार आहे. अशा परिस्थितीत प्रचार समाप्तीच्या आदल्या दोन दिवशी म्हणजे शुक्रवारी भाजपाने आपल्या सभेसाठी हे मैदान आरक्षीत केले असून त्यामुळे आप पक्षाने 13 एप्रिल रोजी या मैदानावर आपली मुख्य सभा ठेवली आहे. या परिस्थितीत काँग्रेसला जर सभा घ्यायची असेल तर इस्टर संडेला दुपारी 4 वाजेर्पयत आपली सभा घ्यावी लागणार आहे.काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांना या संदर्भात विचारले असता, मडगावात मोठी सभा घेण्याचे अजुनर्पयत काँग्रेसने ठरविलेले नाही. प्रचाराचे शेवटचे दिवस होली व्हीकमध्ये येत असल्याने तसेच इस्टर संडेलाही लोक गडबडीत असण्याची शक्यता असल्याने यावेळी बहुतेक काँग्रेस लोहिया मैदानावर आपली सभा घेणार नाही असे ते म्हणाले. तसे झाले तर आतार्पयतच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्याचवेळी काँग्रेस या मैदानावर आपली सभा घेणार नसल्याची नोंद होणार आहे.गांधी कुटुंबीयही गोव्यात येणार नाहीगोव्यातील दोन्ही लोकसभा जागा काँग्रेस जिंकणार असा दावा या पक्षातर्फे केला जात असला तरी यंदा प्रथमच गांधी कुटुंबांतील एकही सदस्य गोव्यात प्रचाराला येणार नाही असे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना यासंदर्भात विचारले असता, सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यापैकी कुणाचीही सभा गोव्याचे घेण्याचे अद्यापर्पयत ठरलेले नाही असे त्यांनी सांगितले. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत फातोर्डा येथे झालेल्या सभेसाठी सोनिया गांधी गोव्यात आल्या होत्या. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी फातोडर्य़ातून लोकांना संबोधित केले होते. मात्र दोन्हीवेळा काँग्रेसला यश आले नव्हते. गांधी कुटुंबियांच्या अनुपस्थितीत आता काँग्रेस शत्रुघ्न सिन्हा किंवा नवज्योत सिद्धू यांची सभा गोव्यात घेता येणो शक्य आहे का याची चाचपणी करत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक