शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

दहशतवादाशी लढण्यास सरकारला पाठिंबा : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:56 IST

या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संताप व रोष व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. आमच्या पक्षाचा यासाठी सरकारला पूर्ण पाठींबा असणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पाटकर यांनी केले. काँग्रेस हाऊज ते आजाद मैदान असे या मेणबत्ती मोर्चाचे स्वरुप होते.

पेहलगाममधील हल्ला हा खुप भयावक आणि अमानुष होता. देवाचा आशीर्वाद आमच्यावर असल्याने हल्ल्याच्या ठिकाणीच फिरायला गेलेले सुमारे ५० गोमंतकीय सुरक्षीत राहीले. पण यापुढे असे हल्ले आम्ही खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश सरकारने दहशतवाद्यांना द्यावा, असे अॅड. अमित पाटकर यांनी यावेळी सांगितले.

कठोर कारवाई करा

या मेणबत्ती मोर्चाला अॅड. अमित पाटकर यांच्यासोबत काँग्रेस महिला मोर्चा अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप, मीडीया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

आत्म्यावर हल्ला : खलप

काँग्रेस महिला अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप यांनी यावेळी सांगितले की, हा हल्ला पर्यटकांवर नसून देशाच्या आत्म्यावर केला आहे, देशातील एकात्मेवर केला आहे. पण या घटनेनंतर आमचा एकात्मता अधिक बळकट झाली असून, ही तोडण्याची क्षमता कुणाचकडे नाही, हे या दहशतवाद्यांनी देखील लक्षात घ्यावे. मरण पावलेल्यां कुटूंबियासोबत आम्ही नेहमीच असणार आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही देवाकडे प्रार्थना आहे.राज्यातील सुरक्षतेबाबत सरकारने गंभिर्याने पाहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. 

 

टॅग्स :goaगोवाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस