शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून विश्वजित बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 11:59 IST

ऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे.

ठळक मुद्देऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य स्पर्धेतून मंत्री विश्वजित राणे हे बाद ठरल्याचे भाजपामधील एका गटाकडून व विरोधी काँग्रेसकडूनही मानले जात आहे.

पणजी - ऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य स्पर्धेतून मंत्री विश्वजित राणे हे बाद ठरल्याचे भाजपामधील एका गटाकडून व विरोधी काँग्रेसकडूनही मानले जात आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानी तीन तास पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नोकर भरतीवरून चर्चा झाली होती, विशेषत: वीज खात्यातील भरतीवरून चर्चा झाली होती, असे अन्य काही मंत्र्यांकडून सांगितले जाते. मात्र वीज मंत्री निलेश काब्राल यांच्या मते क्लीपमध्ये जसा विषय आला आहे तशा प्रकारे चर्चा झाली नव्हती. सध्या प्रत्येक मंत्रीही बाहेर काही बोलताना खूप काळजी घेऊ लागले आहेत. आपणही ऑडीओ क्लीपसारख्या एखाद्या वादात सापडायला नको म्हणून काळजी घेणे योग्य असे मंत्र्यांनी ठरवूनच टाकले आहे. मंत्रिमंडळ बैठकीवेळी राफेलचा विषय आला व सगळी माहिती आपल्याकडे इथे बेडरूममध्ये आहे असे पर्रीकर यांनी नमूद केले असे मंत्री राणे यांनी सांगितल्याचे काँग्रेस पक्ष एका ऑडीओ क्लीपच्या आधारे सांगतो. मात्र तो आवाज आपला नाही, तो काँग्रेसचाच बेबनाव आहे असे मंत्री राणे यांचे म्हणणे आहे. राणे यांनी पोलीस चौकशीही मागितली आहे पण पोलीस खात्याने अजून या विषयाची दखल घेतलेली नाही. 

मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने यापुढील काळात जर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले तर त्यांच्या जागी कुठच्या नेत्याची वर्णी लावावी हे ठरविणे आता भाजपाला सोपे जाईल असे मानले जात आहे. मंत्री राणे व साखळीचे आमदार प्रमोद सावंत हे दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. भाजपाने सावंत यांनाच या शर्यतीत महत्त्व दिलेले आहे. ऑडीओ क्लीपमधील आवाज कदाचित राणे यांचा नसेलही पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा यापुढे त्यांच्या नावाचा विचार करू शकणार नाही,अशी चर्चा सावंत यांचे समर्थक असलेल्या काही आमदार व मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे. 

दरम्यान, ऑडिओ क्लीपने अकारण तणाव निर्माण केला असे मंत्री काब्राल यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलgoaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेस