‘हिंदू राष्ट्र’वरून काँग्रेसचा सभात्याग
By Admin | Updated: July 26, 2014 01:21 IST2014-07-26T01:17:59+5:302014-07-26T01:21:14+5:30
पणजी : पर्रीकर सरकारमधील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हिंदू राष्ट्र येईल, अशा आशयाचे

‘हिंदू राष्ट्र’वरून काँग्रेसचा सभात्याग
पणजी : पर्रीकर सरकारमधील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हिंदू राष्ट्र येईल, अशा आशयाचे विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विविध स्तरांवर उमटू लागले आहेत. मंत्री ढवळीकर यांनी त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी विधानसभेत करत सभात्याग केला आणि पूर्ण कामकाजावरच बहिष्कार टाकला.
केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताचे भाजप सरकार अधिकारावर आल्याने सरकारचे अभिनंदन करणारा ठराव गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्या ठरावावर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी आम्ही सर्वांनी जर मोदी यांना पाठिंबा दिला, तर भारत हे हिंदू राष्ट्र बनेल व मोदी त्या दृष्टीने काम करतील, अशा अर्थाचे विधान केले. राष्ट्रीय स्तरावरही त्याबाबत प्रतिक्रिया उमटण्यास आरंभ झाला. त्यानंतर शुक्रवारी विधानसभा कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे उभे राहिले आणि त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, मंत्री म्हणून ढवळीकर यांनी घटनेची शपथ घेतली आहे. या घटनेचे रक्षण करण्याची शपथ मंत्र्यांनी घेतलेली असते. (पान २ वर)